Himesh Reshammiya,Alka Yagnik  file image
मनोरंजन

हिमेश रेशमियाचा जुना फोटो व्हायरल; नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स

अल्का याग्निक यांच्यासोबतचा हिमेशचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट गाणी देणारा गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. हिमेशच्या सोशल मीडियावरील एका फॅन क्लबने नुकताच त्याचा एक खास फोटो शेअर केला आहे. हिमेशचा या फोटोमधील लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या फोटोमध्ये हिमेश हा प्रसिद्ध गायिका अल्का याग्निक (Alka Yagnik) यांच्यासोबत दिसत आहे. अल्पावधीतच या फोटोला हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Himesh Reshammiya and Alka Yagnik old photo viral on social media)

हिमेशच्या व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये हिमेशने चेक्सचा शर्ट आणि ट्राउजर घातले आहे तर अल्का नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. अल्का आणि हिमेश यांच्या या फोटोमधील लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. एका यूझरने कमेंट केली, 'त्यावेळी हिमेश 50 वर्षांचा होता, आता 25 वर्षांचा दिसतो.' तर दुसऱ्याने लिहिले, 'हिमेश हा 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेमधील भिडे मास्तरसारखा दिसत आहे.'

काही दिवसांपूर्वी हिमेशचे सूरूर 2021 हे गाणे प्रदर्शित झाले. अनेकांची या गाण्याला पसंती मिळाली आहे. सध्या, हिमेश इंडियन आयडॉल १२ या शोमध्ये परिक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. यापूर्वी सा रे गा मा पा चॅलेंज, द वॉइस इंडिया आणि सुपरस्टार सिंगर म्युझिक रिअ‍ॅलिटी शोचे त्याने परिक्षण केले होते. हिमेशने तेरे नाम, ऐतराज, बॉडीगार्ड आणि किक या चित्रपटांना संगीत दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT