Happy Birthday Hina Khan Unknown Facts 
मनोरंजन

Happy Birthday Hina Khan अभिनेत्री नव्हे तर हवाई सुंदरी व्हायचं होतं, रंग आडवा आला! नेहमीच तिला....

हिना ही नेहमीच तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे.

युगंधर ताजणे

Happy Birthday Hina Khan Unknown Facts : टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयानं ज्या अभिनेत्रीनं मोठी पसंती मिळवली त्या हिना खानची चाहतावर्ग मोठा आहे. ती वेगवेगळ्या रियॅलिटी शो मधील देखील सहभागी झाली होती. त्यातूनही तिला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला होता. आज हिनाचा वाढदिवस असून त्यानिमित्तानं तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हिना ही नेहमीच तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. कुणीही ट्रोल केल्यास जशास तसे उत्तरं देणाऱ्या हिनानं आता तिच्या स्वप्नांविषयी सांगितलं आहे. तसेच आपल्याला किती मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं याबद्दल देखील तिनं चाहत्यांना सांगितलं आहे. हिना ही बऱ्याचदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय राहणारी सेलिब्रेटी आहे. ये रिश्ता क्या कहलाता है, मालिकेतून ती सर्वप्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आला होती.

हिनानं तिच्या एका मुलाखतीमध्ये असे सांगितले होते की,तिला अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी हवाई सुंदरी होण्यामध्ये फार रस होता. मात्र तिच्या नशिबानं तिला ती संधी दिली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिला पत्रकारिता क्षेत्रातही आवड होती. काही कारणास्तव ते स्वप्नही भंगलं. दिल्लीतून एमबीए करणाऱ्या हिना ही पहिल्यापासूनच महत्वकांक्षी होती. काहीही झालं तरी मोठ्या पदावर काम करायचं ही तिची इच्छा होती.

२ ऑक्टोबर १९८७ रोजी हिनाचा जन्म हा श्रीनगरमध्ये झाला. ती एका कश्मिरी कुटूंबातून येते. आज ती टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र यापूर्वी तिला अनेक बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. असे तिनं काही मुलाखतीतून सांगितले होते. ये रिश्ता क्या कहलाता है, कसोटी जिंदगी की, बिग बॉस ११ सारख्या वेगवेगळ्या शो मधून हिनानं आपली वेगळी ओळख निर्माण केली.

हिनानं तिच्या त्या मुलाखतीमधून सांगितलं होतं की, तिला तिच्या दिसण्यावरुन आणि रंगावरुन पहिल्यांदा काम मिळणे कठीण झाले होते. एका प्रोजेक्टमध्ये तिला कश्मिरी मुलीची भूमिका करायची होती मात्र तिला ती कश्मिरी मुलीसारखी दिसत नाही म्हणून रिजेक्ट केले गेले होते. असेही हिनानं सांगितले होते. आता हिना ही ७ मिलियन डॉलर म्हणजे ५५.५ कोटींची मालकीण आहे. वर्षाला ५ कोटी रुपये कमावणारी ती सेलिब्रेटी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT