hina khan
hina khan instagram
मनोरंजन

हिना खानला वाढलेल्या वजनाची चिंता नाही; कारण..

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. काही महिन्यांपूर्वी हिनाचे वडील अस्लम खान यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाच्या दु:खातून सावरत असताना हिनाने तिच्या मानसिक स्वास्थ्यावर अधिक भर दिला. त्यामुळे या काळात तिचं वजन वाढलं. आता याविषयी सोशल मी़डियावर पोस्ट लिहित हिना व्यक्त झाली आहे. वजन कमी करण्यापेक्षा मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केल्याचं तिने या पोस्टद्वारे सांगितलं आहे.

हिना खानची पोस्ट :

'होय, काही वैयक्तिक कारणांमुळे माझं वजन काही किलोंनी वाढलं आहे. आणि खरं सांगायचं तर, माझं वजन किती किलो वाढलं याकडे मी लक्षच दिलं नाही. माझ्यासाठी माझं मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी फक्त त्याच गोष्टींची काळजी घेतली ज्यामुळे मला आनंद मिळत होत. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढावा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधावा, तुम्हाला जे करायचं आहे ते विचार न करता करावं. कारण लोक काय विचार करतील आणि तुम्ही कसे दिसाल याचा विचार न करता तुम्हाला जे करायचे आहे ते करा. आयुष्यात काहीही करण्यासाठी बेढब शरीरापेक्षा संतुलित मन असणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच मी सौंदर्यापेक्षा मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं पसंत केलं. आता मी पुन्हा वर्कआऊटला सुरुवात केली आहे,' अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

हिनाला 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने 'खतरों के खिलाडी सिझन ८' आणि 'बिग बॉस ११'सारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT