Hina Khan esakal
मनोरंजन

Hina Khan: ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री हिना खान करतीये गंभीर आजाराचा सामना; पोस्ट शेअर करत म्हणाली,"रमजानचे उपवास..."

Hina Khan: नुकतीच हिनानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून हिनानं तिला झालेल्या गंभीर आजाराबद्दल सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Hina Khan: छोट्या पडद्यावरील ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानचा (Hina Khan) चाहता वर्ग मोठा आहे. हिनानं अनेक मालिका आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. हिना ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. या पोस्टच्या माध्यमातून हिना तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांना देते. अशातच नुकतीच हिनानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून हिनानं तिला झालेल्या आजाराबद्दल सांगितलं आहे.

हिना खान 'या' आजाराचा करतीये सामना

हिना खाननं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोमध्ये खजूर दिसत आहे. हा फोटो शेअर करुन हिनानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "मला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स हा गंभीर आजार (GERD) आहे आणि दुर्दैवाने मी रमजानचे उपवास करत राहिले तर माझी तब्येत बिघडते. आई म्हणते अजवा खजूर खा. .तुम्हाला यावर काही घरगुती उपाय माहित असतील तर ते तुम्ही मला सांगू शकाल का? या पोस्टला कमेंट करा plz, DM करू नका..."

चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

हिना खाननं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन चाहत्यांनी तिच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी हिनाला घरगुती उपचार सांगितले आहेत.

जेव्हा पोटातील आम्ल वारंवार अन्ननलिकेत परत जाते तेव्हा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स आजार होतो. हा ऍसिड रिफ्लक्स तुम्हाला त्रास देऊ शकतो. बऱ्याच लोकांना वेळोवेळी ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होतो.

हिना खाननं या मालिकेत केलं काम

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेसोबतच हिनानं कसौटी जिंदगी की 2 या मालिकेत देखील काम केलं आहे. तसेच तिनं फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी आणि बिग बॉस या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. आता हिनाच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

Mumbai Crime: पाणी भरण्यावरून वाद; महिलेचं डोकं फिरलं; घरातून मॉस्किटो किलर स्प्रे आणलं अन्...; व्यक्तीसोबत नको ते घडलं

चालू सीझरमध्येच डॉक्टरांनी मला प्रश्न विचारला की... मराठी अभिनेत्रीने सांगितला डिलिव्हरीचा तो अनुभव

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

SCROLL FOR NEXT