saba qamar 
मनोरंजन

'हिंदी मीडियम' फेम अभिनेत्री सबा कमरचं मोडलं लग्न 

स्वाती वेमूल

'हिंदी मीडियम' या चित्रपटात अभिनेता इरफान खानसोबत मुख्य भूमिका साकारणारी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या लग्नाविषयीची महत्त्वपूर्ण माहिती दिली. अझीम खान याच्याशी लग्न करणार नसल्याचं तिने या पोस्टद्वारे स्पष्ट केलं. यासाठी काही वैयक्तिक कारणं असल्याचंही तिने लिहिलं. विशेष म्हणजे अझीम खान या व्यक्तीला कधीच न भेटल्याचा आणि फक्त फोनवरून संपर्कात होतो असा दावाही तिने केला आहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. याआधी सबाने अझीमवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. 

काय आहे सबाची पोस्ट?
'मला अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा करायची आहे. अनेक खासगी कारणांमुळे अझीम खानसोबतचं माझं लग्न मी मोडतेय. आमचं लग्न आता होणार नसून माझा हा निर्णय तुम्ही स्वीकाराल अशी मी अपेक्षा करते. कदाचित कटू सत्य जाणण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायची आहे की मी अझीम खानला कधीच माझ्या आयुष्यात भेटले नाही. आम्ही फक्त फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होतो. माझ्यासाठी सध्या हा फार कठीण काळ आहे. पण ही वेळसुद्धा निघून जाईल', अशी पोस्ट तिने लिहिली. 

अझीम खान हा ब्लॉगर आणि व्यावसायिक असून त्याच्याशी सबाचं लग्न ठरलं होतं. काही दिवसांपूर्वी सबाने त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपांबाबत अझीमने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र नंतर त्याने तो डिलिट केला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT