Bigg Boss 16 Ankit Gupta Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: 'बिग बॉसने चिंटींग केली' अंकितला ठरवून शो बाहेर..सोशल मिडीयावर नेटकऱ्यांचा संताप

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16 मध्ये आता एक मोठा नवा ट्विस्ट येणार आहे. सोशल मीडियावर अशी बातमी आहे की वोटिंग लाइन बंद असूनही अंकित गुप्ता या आठवड्यात घराबाहेर पडणार आहे. टीना दत्ता, श्रीजीता डे, विकास मानक्ताला आणि अंकित गुप्ता यांना या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आलं होतं. आता बिग बॉसच्या फॅन पेजवरही अंकित गुप्ता या आठवड्यात बाहेर पडल्याचं समोर आलं आहे.

(Ankit Gupta Eliminated From Bigg Boss 16 In Mid Week)

ही बातमी समोर येताच, सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. अंकितचे चाहते बिग बॉसबद्दल संताप व्यक्त करत आहेत. अंकित गुप्ताचे एलिमिनेशन एकतर्फी असल्याचं त्याचं म्हणणं आहे. मतदानाची लाईन बंद असताना त्याला घराबाहेर कसं काय काढलं हे विचारलं जात आहे. त्याचवेळी, घरातील सदस्यांच्या युक्तीमुळे अंकितसोबत हा प्रकार घडल्याचंही चाहत्यांचं म्हणणं आहे.

घरातील सदस्यांनी त्याला ठरवून नॉमिनेट केलं होतं. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये अर्चना गौतमला अंकितला घरातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण प्रियांका आणि अंकित प्रत्येक क्षणी एकमेकांच्या पाठीशी उभं असतात.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

म्हणूनच अर्चनाला अकिंतनं बेघर व्हावं आणि प्रियांकाने एकटं राहावं असं वाटत होतं. यानंतर, कुटुंबातील इतरांनीही अर्चनाला पाठिंबा दिला आणि सांगितले की अंकितला या आठवड्यात काढून टाकावं अशी तिची इच्छा होती. अशा स्थितीत कुटुंबीयांनी अंकित गुप्ताचे नाव घेऊन त्याला घराचा बाहेरचा दरवाजा दाखवला. पण सोशल मीडियावर यूजर्स अंकितला परत आणण्याची मागणी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT