Tamil TV Actor Pawan Death: Esakal
मनोरंजन

TV Actor Pawan Death: प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याचे वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निधन...

Vaishali Patil

TV Actor Pawan Death: साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधुन एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता पवन सिंह याने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पवनला हृदयविकाराचा झटका आला होता. पवनचे 18 ऑगस्टला निधन झाले.

पवन हा मुळचा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात राहत होता. कर्नाटकचा असून तो कामानिमित्त कुटुंबासह मुंबईत राहत होता. मीडिया रिपोर्टनुसार पवनचा मृतदेह मुंबईहून त्याच्या मूळ गावी मांड्या येथे नेण्यात येणार आहे. तिथे त्याचे कुटुंबीय त्याच्यावर अंतिम संस्कार करतील.

पवनच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. अद्याप हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या मृत्यू झाला आहे की दुसरे काही कारण होते याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

त्याच्या चाहत्यांसह अनेक कलाकार आणि राजकीय मंडळींनी पवनच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्यात मंड्याचे आमदार एचटी मंजू, माजी आमदार केबी चंद्रशेखर, माजी मंत्री केसी नारायण गौडा, माजी आमदार बी प्रकाश, टीएपीसीएमएसचे अध्यक्ष बीएल देवराजू, काँग्रेस नेते बुकनाकेरे विजया रामेगौडा, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बी नागेंद्र कुमार, इतर अनेकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT