Bigg Boss 16 MC Stan Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: "तेरा घर चला जाएगा इसमें" शेवटी डायलॉग मारलाचं! टिनावरुन पुन्हा शालिन आणि स्टॅन मध्ये राडा...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16 मध्ये आता स्पर्धक जिकंण्यासाठी काहीही करायला तयार आहे. अब्दू गेल्यापासून प्रेक्षकांमध्ये या शो विषयी नाराजी असली तरी काही स्पर्धकांची खेळी त्याचं मनोरंजन करत आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये सौंदर्या शर्मा, एमसी स्टॅन आणि सौंदर्या शर्मा घराच्या कॅप्टन कसे बनले हे आपण पाहिलं.

यानंतर, कर्णधारपदाच्या टास्कमध्ये त्यांची नावं न घेतल्यानं काही घरातील सदस्यांमध्ये बरीच नाराजी होती. आता आगामी एपिसोडमध्ये एक नॉमिनेशन टास्क असेल, ज्यामध्ये शिव ठाकरे, निमृत कौर अहलुवालिया, सुंबुल तौकीर खान यांच्या निशाण्यावर प्रियंका आणि अंकित राहणार आहे. यावेळीचं एमसी स्टेनचं अन् शालीनचं जोरदार भांडण होतांना दिसतंय.

ऐकीकडे सगळे प्रियंका आणि अंकितला नॉमिनेट करत असतांना सगळ्याचं झाल्यानंतर एमसी स्टॅन येतो आणि तो त्याच्या 'टिंजी' म्हणजेच ​​टीना दत्ताचं नाव घेतो. मला टीनाला नॉमिनेट करायचं आहे, असं तो सांगतो .

ती बदलली म्हणूनच मी तिला नॉमिनेट करतो ​​आहे असं तो बोलतो. टीना विचारते की ती कशावरुन पलटली होती आणि शालीन म्हणतो की ती इतका काय भडकत आहे. एमसी स्टॅनला राग येतो आणि शालीनला त्याच्या चेहऱ्याला हात लावू नको असं सांगतो. टीना म्हणते - दागिन्यांच्या मागे मुखवटा घातलेला आहेत. हे ऐकून स्टॅन म्हणतो - दागिन्यांवर जाऊ नको, तुझं घर जाईल त्यात..."

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

त्यानंतर शालीन भानोत आणि एमसी स्टॅनमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. स्टॅनवर रागावून शालीन म्हणतो, शाहपणा करु नकोस, तुला समजलं का.. हे बोलताचं दोघांमध्ये हाणामारी सुरु होते. सगळं घर दोघांचा वाद मिटवण्यासाठीमध्ये पडतं. .

शालीन म्हणतो, मी तुझ्याशी बोलतही नव्हतो तर स्टॅन पुन्हा म्हणतो...''अॅक्टिंग वैक्टिंग दाखवू नको. हे घरी जावून करा.. घरी जावून करं. इथं राहायचं आहे". आता या टास्कनंतर कोणाला उमेदवारी मिळते, हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Latest Maharashtra News Updates : पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Kapil Patil: राष्ट्रवादीच्या खासदाराचा अजब दावा, खिल्ली उडवत माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT