Tina Datta Elimination Esakal
मनोरंजन

Bigg Boss16: टीना दत्ताला मोठा झटका! बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता?

सकाळ डिजिटल टीम

रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' आता जास्तचं मनोरंजक झाला आहे. आता या शोबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. घरातील तगडी स्पर्धक टीना दत्ताला या आठवड्यात घरातुन बाहेर जावं लागणार असा दावा करण्यात आला आहे. ती या आठवड्यात नॉमिनेट झालेली होती. तिच्यासोबत निमृत कौर अहलुवालिया, सुंबूल तौकीर खान आणि एमसी स्टॅन यांनाही नॉमिनेट करण्यात आलं होतं. (bigg boss 16 confirmed Tina Datta EliminationToday)

तेव्हापासूनच टिना दत्ता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. त्यातच बाहेर पडण्याच्या वृत्ताने काहींना आनंद झाला तर अनेकांना दुःख झाले. आजच्या वीकेंड का वार मध्ये, सलमान खान टीनाचा क्लास देखील घेणार आहे, ज्यामुळे ती शोमध्ये रडतांनाही दिसणार आहे.

टीना दत्ता बेदखल झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. दरम्यान चॅनेल किंवा निर्मात्यांकडून याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. आजच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये सलमान खान घराबाहेरच्या गोष्टीवर घरात चर्चा केल्यामूळं टीना दत्ताचा क्लास घेणार आहे. तिला काही प्रॉब्लेम आहे का असं विचारल्यानंतर ती रडते. त्यानंतर ती कन्फेशन रूममध्ये जाते आणि सांगते की ती आता हे नाही करू शकत.

हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

दरम्यान, टीनाला बाहेर काढल्याची बातमी ऐकल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक असेही म्हणत आहेत की टीनाला हाकलून दिलं जाणार नाही, तर तिला सिक्रेट रुममध्ये पाठवलं जाऊ शकतं. तर अनेक लोक टीना दत्ताच्या समर्थनातही आहेत. टीनाची अवस्था पाहून त्यांना वाईटही वाटत आहे.

या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी 4 स्पर्धक नामांकित आहेत. या यादीत टीना दत्ता व्यतिरिक्त निमृत कौर अहलुवालिया, सुंबुल तौकीर खान आणि एमसी स्टेन यांचाही समावेश आहे. टीनाला आता बाहेर काढलं जाईल की आणखी कोणी बाहेर जाईल, हे वीकेंड का वारमध्येच कळेल. तुम्ही कलर्स चॅनल आणि वूट अॅपवर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार-रविवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT