Bigg Boss 16 Abdu Rozik Esakal
मनोरंजन

Bigg Boss16: निर्माते घाबरले की काय? अब्दू शोमध्ये परत येणार....

सकाळ डिजिटल टीम

हिदीं रियॅलिटी शोमध्ये सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस आता अंतिम टप्प्यात पोहचला पण वाढती लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी हा शो आणखी काही दिवस वाढवला आहे. मात्र गेल्याकाही दिवसांपूर्वी शो मधील लोकप्रिय स्पर्धक अब्दु रोजिक याला शोमधून काढून टाकण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी एकच राडा केला होता.

अब्दु नाही तर शो पाहणार नाही अशी भूमिका प्रेक्षकांनी घेतली. त्याला काढण्यात आल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी होती. हिच नाराजी लक्षात घेता शो च्या निर्मात्यांनी अब्दुला शोमध्ये पुन्हा घेण्याचा विचार केला आहे.

अब्दु रोजिकला बिग बॉस 16 मध्ये प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. लोक त्याची निरागसता प्रेक्षकांना मोहित करते. अलीकडे, जेव्हा अब्दू एक टास्क पूर्ण करण्यासाठी शोच्या बाहेर गेला तेव्हा कुटुंबातील सदस्यांना तसेच चाहत्यांना त्याची खूप आठवण आली. सोशल मीडियावर अब्दूला शोमध्ये परत आणण्याची मागणी होत होती. आता अब्दू परत आल्याने चाहत्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

माहितीनुसार, अब्दू रोजिक बिग बॉस 16 मध्ये परतला आहे आणि सध्या घरामध्ये आहे. त्याची झलक वीकेंड का वारमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याला पाहून घरातील सदस्यांच्या आनंदाला उधान येणार आहे. खंर ठाकरे आणि एमसी स्टॅन खूप खुश आहेत. मात्र त्याच बरोबर अब्दु जानेवारीत शो सोडणार आहे.

अब्दू रोजिकशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे की, तो काही दिवसांसाठीच शोमध्ये आला आहे. कामाच्या कमिटमेंटमुळे त्याला जानेवारी महिन्यातच शो सोडावा लागणार आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT