Big Boss 16
Big Boss 16 Esakal
मनोरंजन

Big Boss 16: ‘या’ स्पर्धकांवर या आठवड्यात एलिमिनेशनची टांगती तलवार...

सकाळ डिजिटल टीम

टिव्हि विश्वातील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. या शोमध्ये कधी काय होइल सांगता येत नाही. त्यातच कधी कुणाचा शो मधील हा शेवटचा आठवडा असू शकतो हे सांगणे ही तितकेच अवघड आहे. आता पर्यंत बरेच स्पर्धक ह्या शोमधून बाहेर गेले आहे. त्यातच गौतमचाही नंबर लागला. मात्र यंदाच्या आठवड्यातही पाच स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार लटकलेली आहे. पाच स्पर्धकांचं या आठवड्यात एलिमिनेशनसाठी नामांकन देण्यात आले आहे.

यावेळी 'क्राइम सीन' नावाचं अनोख नामांकनाचं टास्क चार फेऱ्यांमध्ये पार पडलं. 'बिग बॉस'च्या प्रत्येक फेरीत एका किलरला दोनपैकी एकाला रायफल वापरून ठार मारण्यासाठी सांगण्यात आलं होतं. या आठवड्यात बिग बॉस 16 च्या कॅप्टन हे पद कोणाला मिळणार  यावरुनही उत्सुकता होतीच. निमृत कौर अहलुवालिया आणि अब्दू रोजिक यांना एका टास्कमध्ये पराभूत केल्यानंतर, शिव ठाकरेची 'बिग बॉस 16' च्या घराचा कर्णधार म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली. आता पुन्हा घराची दोर शिवच्या हातात आली आहे.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

तसंच शोबद्दल सांगायच झालं तर, बिग बॉस 16 हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11:30 या वेळेत कलर्स टीव्हीवर प्रसारित केला जातो तसंच OTT प्लॅटफॉर्म Voot वर देखील चाहत्यांना हा शो पाहता येतो. त्यातच बरोबर ‘वीकेंड का वार’ शनिवार आणि रविवारी पाहायला मिळतो. MyJio अॅप, Voot अॅप किंवा Voot.com वर लॉग इन करून, सर्व चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना घरातून बाहेर पडण्यापासून वाचवण्यासाठी आपलं मत देऊ शकतात. निकाल वीकेंड का वार शो दरम्यान जाहीर करण्यात येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT