Hindi tv serial bhabiji ghar par Hain fame nehha pendse troll says i am not Bharati Singh or Kapil Sharma who crack jokes 
मनोरंजन

नेहा कडाडली; मी काही कपिल शर्मा, भारती नाही लोकांना हसवायला

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या भलतीच चिडलेली दिसत आहे. सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा आहे. नेहा ‘भाबीजी घर पर हैं’ मालिकेत काम करत आहे. तिच्या जागी सौम्या टंडन ही काम करत होती. नेहाच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. चाहत्यांकडून नेहाचे कौतूकही होत आहे. मात्र काही नेटक-यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याचे कारण म्हणजे नेहानं सौम्याच्या ऐवजी काम करणे हे त्यांना आवडलेले नाही. त्यामुळे नेहाला त्यांच्या टीकेला सामोरं जावं लागतं आहे. मात्र नेहानं त्यांना परखड शब्दांत सुनावले आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नेहानं याविषयी सांगितले की, लोकांनी आतापर्यत मला अनिता भाभीच्या भूमिकेत पाहिलेलं नाही. माझी केवळ एक छलक त्यांनी पाहिली आहे. मला हे माहिती आहे की, लोकं नावं ठेवणार, टीका करणार, याचे एक महत्वाचे कारण म्हणजे सौम्याशी प्रेक्षक इमोशनली कनेक्ट झाले होते. मला ही गोष्ट पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे प्रेक्षकांना समजून घ्यायला मला थोडा वेळ लागेल. एक नवीन नाते निर्माण तयार करायला थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. तेव्हा मला पूर्ण खात्री आहे की, प्रेक्षक मला स्वीकारतील.

सौम्या आणि नेहाची याबाबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. तसेच त्यांनी मालिकेबद्दलही वाच्यता केली नाही. नेहा म्हणाली, कुठलीही नवीन भूमिका करायची म्हटल्यास फार मेहनत घ्यावी लागते. विनोदी भूमिका साकारणं आव्हानात्मक काम आहे. ते मी करत आहे. ही एक मालिका आहे. त्यात दाखवले जाणारे डायलॉग मोठ्या गंमतीदार पध्दतीनं दाखवले जातात. मला काही कॉमेडी करण्याची गरज नाही. खरं सांगायचे तर मी काही भारती सिंग किंवा कपिल शर्मा नाही की जोक करुन प्रेक्षकांना हसविण्याचे काम करु. माझ्यासाठी सिच्युएशन कॉमेडी चांगला ऑप्शन आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT