Marilyn Monroe
Marilyn Monroe Google
मनोरंजन

बेडरुममध्ये न्यूड अवस्थेत सापडलेली मर्लिन मुनरो; आत्महत्या होती की खून?

प्रणाली मोरे

मर्लिन मुनरो(Marilyn Monroe) हे नाव ओठांवर आलं की डोळ्यासमोर येतो तो फोटो,ज्यात लालभडक रंगाची लाली ओठांवर लावून आपल्या उडत्या ड्रेसला दोन्ही हातांनी सावरणारी हॉट अभिनेत्री. सोनेरी केस, मादक डोळे आणि गालावर तीळ हा सुंदर चेहरा आजही डोळ्यासमोर कायम आठवतो. त्या काळात मर्लिनला केवळ पाहण्यासाठी चाहत्यांचे डोळे व्याकुळ असायचे. तिच्या आयुष्यात सगळं तिनं कमावलं होतं. नाव,पैसा,इज्जत...पण या श्रीमंती थाटामुळेच तिच्या वाट्याला जास्त जगणं आलं नाही. निव्वळ ३६ व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. तिचा मृत्यू अनेक प्रश्न,गुढ,रहस्य मागे सोडून गेला. आतापर्यंत लोक त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना दिसत आहेत.

Marilyn Monroe

मर्लिनच्या मृत्यूनंतर ज्या बातम्य छापून आल्या होत्या,त्यानुसार तो दिवस होता ५ ऑगस्ट १९६२. पहाट होणारच होती,सकाळचे साधारण ३ वाजले होते. तेव्हा मर्लिन मुनरोचे मानसोपचार तज्ञ तिच्या बेडरुमची खिडकी तोडून आत गेले,तेव्हा त्यांनी पाहिलं की मर्लिन बेडवर मृत अवस्थेत पडली होती आणि तिच्या जवळच झोपेच्या गोळ्यांची पू्र्ण रिकामी बाटली पडलेली होती. मर्लिनकडे काम करणाऱ्या नोकराला जाग आली तेव्हा त्यानं पाहिलं की मर्लिनच्या खोलीची लाइट चालू आहे,आणि दरवाजा आतून बंद केलेला आहे. मर्लिन बेडवर न्यूड अवस्थेत उलटी झोपली होती. आणि तिच्या हातात टेलिफोन होता. मर्लिननं मानसोपचार तज्ञांना फोन करुन बोलावून घेतलं होतं. ती शेवटचं त्यांच्याशीच बोलली होती.

पोलिसाच्या रीपोर्ट्सनुसार, मर्लिननं मृत्यूपूर्वी आपल्या मानसोपचार तज्ञांना फोन करुन बोलावलं होतं,तिनं त्यांच्याकडे तक्रार केली होती. ती म्हणाली होती,''तिला झोप येत नाही,त्यामुळे राइडसाठी बाहेर जात आहे''. पण जेव्हा मर्लिनकेड काम करणाऱ्या महिला नोकरानं मानसोपचार तज्ञांना सांगितलं की ,मर्लिनच्या खोलीची लाइट चालू आहे आणि ती न्यूड अवस्थेत पडलीय तसंच खोलीचा दरवाजा आतून बंद आहे तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. कारण मर्लिनशी फोनवर बोलल्यानंतर त्यांना वाटलं होतं की ती राइडसाठी समु्द्रकिनारी किंवा पार्कात गेली असेल.

Marilyn Monroe

मर्लिनच्या अचानक झालेल्या मृत्यूनं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. जेव्हा तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी इस्पितळात नेण्यात आला तेव्हा सगळ्यांच्या नजरा घड्याळावर खिळल्या होत्या,कारण प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की मर्लिनच्या मृत्यूचं नेमंक कारण काय होतं. तिच्या पोस्टमार्टम रीपोर्टमध्ये सांगितलं गेलं होतं की ड्रग्सच्या जास्त सेवनामुळे तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या घरातही कोणती सुसाइड नोट मिळाली नाही. ती ज्या घरात मृत्यूमुखी पडली ते घर तिनं काही दिवसांपूर्वीच खरेदी केलं होतं.

नेटफ्लिक्सच्या 'द मिस्ट्री ऑफ मर्लिन मुनरो: द अनहर्ड टेप्स' या डॉक्युमेंट्रीमध्ये तिच्याविषयीच्या अनेक न माहित असलेल्या गोष्टींचा खुलासा करण्यात आला होता. मर्लिनशी जवळचे संबंध असलेल्या काही लोकांशी बातचीत करुन तिच्या मृत्युच्या रहस्याचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये ग्लॅमरस जगाची दुसरी काळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. यामध्ये सांगितलं गेलं होतं की, ४ ऑगस्ट,१९६२ च्या रात्री १० वाजता हॉलीवूड जगतात खूप वाईट घडलं. रॉबर्ट कॅनडी मर्लिनच्या मृत्यूदिवशी दुपारी २ वाजता तिच्या घरी होते. रॉबर्ट केनेडी म्हणजे बॉब हे तेव्हाचे अमेरिकी राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांचे भाऊ होते. अभिनेत्रीनं आपल्या एका मित्राला सांगितेलं की तिचं बॉब केनेडीवर खूप प्रेम आहे. तिला त्यांच्याशी लग्न करायचं आहे. तिनं हे देखील सांगितलं होतं की बॉब आणि तिच्यात खूप भांडण झालं होतं. नेमकं त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला होता. या डॉक्युमेंट्रीत दाखवलं गेलं आहे की मर्लिनच्या मृत्यूदिवशी बॉबनं रात्री २ ते ३ च्या दरम्यान फ्लाइट पकडण्यासाठी हेलिकॉप्टरमधून एअरपोर्ट गाठलं होतं. पण,खरं सत्य काय आहे हे अद्याप रहस्यच बनून राहिलं आहे.

Marilyn Monroe

मर्लिन तिच्या सिनेमांपेक्षा अधिक अफेअर्समुळे चर्चेत राहिली. बोललं जातं की तिनं वयाची १६ वर्ष पूर्ण केल्यावर १९४२ मध्ये जेम्स डोहर्टीसोबत लग्न केलं होतं. पण ती त्या लग्नानं खुश नव्हती. लग्नानंतर १ वर्षात जेम्स नेवीत निघून गेले आणि मर्लिन पैसे कमावण्यासाठी कारखान्यात काम करायला लागली. काही फोटोग्राफर तिथे फोटो क्लिक करण्यासाठी आले होते,त्यांना मर्लिनचा चेहरा फोटोजेनिक वाटला आणि त्यानंतर तिचं नशीब फळफळलं. जेम्सपासून १९४६ मध्ये विभक्त झाल्यानंतर तिनं १९५४ मध्ये जो दिमॅगिओसोबत लग्न केलं, पण ते नातंही १ वर्षच टिकलं. त्यानंतर १९५६ मध्ये अर्थर मिलरसोबत तिनं लग्न केलं. ते नातं १९६१ पर्यंत टिकलं आणि १९६२ मध्ये मर्लिनचा मृत्यू झाला. लग्न झालेलं असतानाही तिच्या अफेअरच्या चर्चाही रंगायच्या. मर्लिनच्या मृत्यूनंतर तिनं लिहिलेल्या काही नोट्स मिळाल्या होत्या. ज्यात तिनं आपल्या आयुष्यातील काही खास गोष्टींचा खुलासा केला होता. यामध्ये खूप दुःख दडलं होतं. ती खूप वेगळी होती. आणि म्हणूनच आज ६० वर्षानंतरही तिच्या मृत्यूचा गुंता अजूनही सुटत नाहीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT