Barbie- Baipan Bhari Deva Esakal
मनोरंजन

Barbie- Baipan Bhari Deva: महाराष्ट्रात 'बाईपण भारी ' अन् जगात 'बार्बी'! कमाईचे आकडे पाहून व्हाल हैराण

Vaishali Patil

Barbie- Baipan Bhari Deva Box Office Collection: हॉलिवूड चित्रपट प्रेमीसाठी हा आठवडा खूप खास होता. या आठवड्यात, हॉलिवूडचे दोन बहुप्रतिक्षित चित्रपट 'बार्बी' आणि 'ओपनहायमर' एकाच वेळी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांना आता प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

मात्र बार्बीनं बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. 'ओपनहायमर' च्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत बार्बी पुढे राहिली. हॉलिवूड अभिनेता रायन गोसलिंगसोबत अभिनेत्री मार्गोट रॉबी बार्बीमध्ये दिसली आहे.

'बार्बी' हा हॉलिवूड चित्रपट असून तो भारतातही फक्त इंग्रजी भाषेतच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बार्बी आणि केन यांनी जगाला त्यांच्या रंगीबेरंगी दुनियेत घेऊन गेले आहेत.

इंग्रजी भाषा असतांनाही पहिल्या दिवशी बार्बीनं 5 कोटींचा व्यवसाय नंतर शनिवारी 6.5 कोटी आणि रविवारी 7.13 कोटींचा व्यवसाय केला आहे. अशाप्रकारे बार्बीने आतापर्यंत भारतात 18.63 कोटींचा वीकेंडचा व्यवसाय केला आहे.

बार्बीची क्रेझ भारतात खुप आहे. त्यामुळे या चित्रपटाचा परिणाम करण जोहरच्या 'रॉकी और राणी की प्रेमकहानी' वर होणार असं दिसतयं.

या चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने जगभरात एकूण 2050 कोटींची कमाई केली आहे, म्हणजे सुमारे 300 मिलियनची आणि ओपनहायमर जगभरात 165 मिलियनची कमाई केली आहे.

तर मराठी मनोरंजन विश्वातील 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. या सिनेमाला रिलिज होऊन बरेच दिवस झाले असले तरीही या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.

30 जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहे आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 60 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT