Hollywood Movie Latest news esakal
मनोरंजन

Hollywood Movie News : हॉलीवूडमध्येही महिला दिग्दर्शकांचे प्रमाण का होतयं कमी? 100 सर्वोत्तम चित्रपटांमध्ये फक्त...

हॉलीवूडमधील चित्रपट आणि महिला दिग्दर्शक (Hollywood Movie News) या विषयावरील एक रिसर्च समोर आला आहे.

युगंधर ताजणे

Hollywood News- हॉलीवूडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्यात गेल्या वर्षभरात हॉलीवूडमधून महिला फिल्ममेकर्सची संख्या कमी झालेली दिसते. त्यात धक्कादायक बाब अशी की, गेल्या वर्षी महिला दिग्दर्शकांनी (Hollywood Women Director Role ) जेवढ्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले ते सर्व चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे.

हॉलीवूडमधील चित्रपट आणि महिला दिग्दर्शक या विषयावरील एक रिसर्च समोर आला असून त्यातून काही धक्कादायक गोष्टी उघडकीस (Hollywood Latest News) आल्या आहेत. त्यातून हॉलीवूडमधील महिला दिग्दर्शकांची भागीदारी कमी होत असल्याचे म्हटले जात आहे. हॉलीवूड सारख्या प्रसिद्ध चित्रपट विश्वातून महिलांच्या वाट्याला असे उणेपण येण्यामागे काय कारण असू शकते यावर त्या रिपोर्टमधून काही माहिती समोर आली आहे.

फिल्मी जग हे आपल्याला जेवढं झगमगीत दिसतं तेवढं ते प्रत्यक्षात किती मुखवटाधारी लोकांचे आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या इंडस्ट्रीमध्ये लिंग भेद होत असल्याचे यापूर्वी अनेक सेलिब्रेटींनी सांगितले आहे. त्यावरुन काही वादही समोर आले आहेत. महिला दिग्दर्शकांना देखील त्याचा मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या दहा वर्षातील हॉलीवूड मधील महिलांची भागीदारी ही कमी होत चालल्याचे सांगण्यात येत आहे. जागरणनं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. गेलं वर्ष त्याबाबत चिंताजनक असल्याचे त्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. युएसीच्या एननबर्ग इन्क्ल्युजन इनिशिटीवर च्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी सर्वाधिक लीड रोल मध्ये महिलांचा सहभाग हा फारच कमी असल्याचे दिसून आले आहे. मात्र ज्या चित्रपटांमध्ये महिलांनी लिड अॅक्ट्रेसची भूमिका साकारली होती त्यांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

१०० मध्ये केवळ १६ चित्रपट महिलांचे...

महिलांची भूमिका असणारे नव्हे तर महिला दिग्दर्शकांचे चित्रपट कमी होत चालल्याचे तो रिपोर्ट सांगतो. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्याचे दिसून आले आहे. त्यात उदाहरण द्यायचे झाल्यास बार्बीचे देता येईल. त्याचे दिग्दर्शन ग्रेटा गर्विगनं केलं होतं. या वर्षी हॉलीवूडचे जे सर्वोत्तम १०० चित्रपट आहेत त्यात महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची संख्या ही केवळ १६ आहेत. २००२ मध्ये ही संख्या १८ एवढे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT