honey singh Sakal
मनोरंजन

Honey Singh Birthday: हनी सिंगने वाढदिवशी चाहत्यांना दिली 'ही' खास भेट

हनी सिंगने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास भेट दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध गायक आणि रॅपर आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी रॅपरने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे.

हनी सिंगच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री बनवली जात आहे, जी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हनी सिंगच्या आयुष्यावर बनलेल्या डॉक्युमेंट्रीचा टीझर रिलीज झाला आहे, जो पाहून चाहते खूश आहेत.

हनी सिंग आणि नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक जॉइंट पोस्ट शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये हनी सिंग स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे आणि प्रेक्षक त्याला चीयर करत आहेत.

मोजेज सिंग यांनी रॅपर हनी सिंगच्या जीवनावरील माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. आणि त्याचे निर्माते ऑस्कर पुरस्कार विजेते गुनीत मोंगा आहेत. या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंगचा प्रवास दाखवण्यात येणार आहे, तो काही वेळातच देशातील सर्वात मोठा रॅपर कसा बनला. यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो अचानक इंडस्ट्रीतून कसा गायब झाला.

हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंह आहे. त्याने 2003 मध्ये पंजाबी रॅपर म्हणून संगीत जगतात थैमान घातले होते. 'ब्राऊन रंग', 'देसी कलाकर', 'ब्लू आईज' सारखी सुपरहिट गाणी दिली. याशिवाय त्याने बॉलिवूड चित्रपटांसाठीही अनेक गाणी गायली आहेत.

हनी सिंगने आपल्या करिअरमध्ये खूप वेगाने प्रगती केली आणि त्यानंतर 2015 सालानंतर तो मनोरंजन उद्योगातून गायब झाला. मात्र, आता त्याने हनी 3.0 म्युझिक अल्बमद्वारे पुनरागमन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT