Honey Singh Divorce Delhi Court Grants Wife Shalini Talwar esakal
मनोरंजन

Honey Singh Shalini Divorce : प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगचा घटस्फोट मंजूर! तेरा वर्षांनी घेतला काडीमोड

प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Honey Singh Divorce Delhi Court Grants Wife Shalini Talwar : प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. हनी सिंगनं घटस्फोटासाठी जो अर्ज केला होता अखेर दिल्ली कोर्टानं मंजूर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या अर्जावर सुनावणी सुरु होती. तेरा वर्षांच्या संसारानंतर हनी सिंगनं पत्नी शालिनी तलवार पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कोर्टानं हनी सिंग आणि शालिनी तलवार यांच्या घटस्फोटाच्या अर्जाला परवानगी दिली आहे. मागील एक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. यावेळी दोन्ही सेलिब्रेटींकडून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप समोर आले होते. शालिनीनं हनी सिंगच्या विरोधात कौटूंबिक हिंसाचाराची याचिका दाखल केली होती. त्यानंतर हनी सिंगनं देखील शालिनीच्या विरोधात वेगवेगळे आरोप केले होते.

दिल्ली कौटूंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायधीश परमजीत सिंग यांनी हा घटस्फोट मंजूर केला आहे. शालिनीनं यापूर्वी हनी सिंगकडे मोठ्या प्रमाणात पोटगीची मागणीही केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा झाली होती. हनी सिंगनं देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याविषयी चाहत्यांना काही गोष्टींबाबत आवाहन केले होते.

एक कोटींच्या पोटगी दिल्यास केस मागे घेण्याचा विचार करु असे पत्नी शालिनीकडून सांगण्यात येत होते. हनी सिंगकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे शालिनीनं म्हटलं होते. जानेवारी २०११ मध्ये त्या दोघांचा विवाह झाला होता. त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

या पुढील काळात आपल्याला पत्नी शालिनीसोबत राहता येणार नाही. असे हनी सिंगनं म्हटले होते. वकील इशान मुखर्जी यांनी हनी सिंगच्या वतीनं बाजू मांडली. त्यांनी या प्रकरणाविषयीची अतिरिक्त माहिती देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT