houseful 4 first dong released  
मनोरंजन

हाउसफुल 4 चं 'एक चुम्मा' गाणं रिलिज, अभिनेत्रीच्या सॅंडलला किस करताना दिसला अक्षय

वृत्तसंस्था

मुंबई : सद्या इंटरनेटवर चर्चा आहे ती 'हाउसफुल 4' ची. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटासाठी उत्सुकता अधिक वाढली आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा हा दमदार चित्रपट कॉ़मेडीची मेजवानी असणार आहे. ट्रेलरनंतर चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. 'एक चुम्मा' असं या गाण्याचं नाव असून इंटरनेटवर ते चांगलच व्हायरल होत आहे.

या गाण्याला ऐकल्यावर ताल धरण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही. या गाण्यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, पूजा हेगड़े, कृती सॅनन और कृती खारबंदा हे दिसत आहेत. गाण्यामध्ये संपूर्ण कास्ट कॉमेडी अंदाजात दिसत आहे. अक्षय तर चक्क अभिनेत्रीच्या सॅंडलला किस करताना दिसत आहे. या गाण्याचं शुटिंग लंडनमधल्या पाच जागांवर करण्यात आलं आहे. सोहेल सेन, अल्तमश फरीदी, ज्योतिका टांगड़ी यांनी गाणं गायलं असून समीर अनजान यांनी लिरिक्स दिलं आहे. गाण्यामध्ये चित्रपटातील हिरो आल्या प्रेयसींना इम्प्रेस करताना दिसत आहेत. 

अक्षय कुमारसह कृती सॅनन, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा दुगुब्बती,कृती खारबंदा,पूजा हेगड़े, अमंदा रुसारिओ, चंकी पांडे, नवाझुद्दिन सिद्धीकी अशी दमदार कास्ट या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 26 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचवेळी राजकुमार रावचा 'मेड इन चायना' आणि तापसी पन्नू व भूमी पेडणेकरचा 'सांड की आंख' हे दोन चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहेत. त्यावेळी या चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा होणार आहे. आता मात्र हे पाहावं लागेल की कोणता चित्रपट ब्लॉकबस्टरवर बाजी मारणार ! 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडरच्या मुद्यावर सरकारने केले हात वर? नागरिकांना विकल्प शोधण्याचे आवाहन, नेमकं काय सांगितलं?

Iran War : अमेरिका-इराण युद्धामुळे इंग्लंडचे क्रिकेट खेळायचे झालेत वांदे! Dukes Ball चा तुटवडा अन् गगनाला भिडल्या किमती...

World Sparrow Day : ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’ शहरातून हरवलेली चिऊताई पुन्हा कशी येईल?

राज्य सहकारी बँकेची ‘थकबाकी निवारण योजना २०२६’ जाहीर; हजारो कोटींच्या कर्ज निपटाऱ्याला गती

Latest Marathi News Live Update : लोणावळा नगरपरिषदेत तणाव; नगराध्यक्षांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या कॅबिनला ठोकले टाळे...

SCROLL FOR NEXT