anupam tripathi
anupam tripathi  Instagram
मनोरंजन

Squid Gameमुळे एका तासात बदललं आयुष्य

स्वाती वेमूल

अवघ्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर ३ हजारांवरून ३ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स

Instagramनेटफ्लिक्सवरील Netflix स्क्विड गेम Squid Game या वेब सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. अवघ्या महिन्याभरात १३ कोटींहून अधिक व्हूज मिळालेल्या या सीरिजमध्ये एका भारतीय अभिनेत्यानेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. अनुपम त्रिपाठी असं या अभिनेत्याचं नाव असून त्याने सीरिजमध्ये अली अब्दुल या पाकिस्तानी स्तलांथरित कामगाराची भूमिका साकारली आहे. 'स्क्विड गेम'मुळे अवघ्या तासाभरात माझं आयुष्य बदललं, अशी प्रतिक्रिया अनुपमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.

"प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम हे प्रत्येक दिवसाला वाढत आहे. अशा वेब सीरिजचा भाग होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही सर्व प्रसिद्धी माझ्यासाठी नवीन आहे. स्क्विड गेमला इतकं प्रेम मिळेल याची आम्हाला किंचितही कल्पना नव्हती. मला अजूनही तो दिवस स्पष्टपणे आठवतोय, ज्यादिवशी ही सीरिज प्रदर्शित झाली. संध्याकाळी ४ वाजता नेटफ्लिक्सवर या सीरिजचा प्रीमिअर झाला. तोपर्यंत माझं आयुष्य सर्वसामान्य कलाकारासारखं होतं. मात्र पाच वाजल्यानंतर मला असंख्य फोन येऊ लागले. माझ्या भूमिकेचं ते कौतुक करू लागले. सोशल मीडियावरही माझ्याबद्दल असंख्य पोस्ट लिहिले जाऊ लागले", अशा शब्दांत अनुपमने त्याचा अनुभव सांगितला. इन्स्टाग्राम अकाऊंटवरही अनुपमचा चाहतावर्ग वाढतो आहे. अवघ्या तीन हजारांवरून आता अनुपमचे तीन दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत.

अनुपम हा दिल्लीचा असून तिथेच तो लहानाचा मोठा झाला. नाटकं, संगीत यांची आवड त्याला लहानपणापासूनच होती. त्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) दाखल व्हायचं होतं. मात्र अनुपमच्या नशिबात काहीतरी वेगळंच होतं. अभिनयाच्या जोरावर अनुपमला आर्ट्स स्कॉलरशिप मिळालं आणि त्यानंतर २०१० मध्ये तो दक्षिण कोरियातील कोरिया नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्समध्ये दाखल झाला.

"दिल्ली ते कोरिया हा माझा प्रवास काही सोपा नव्हता. पण तो रंजक नक्कीच होता. आयुष्यातील बरेच चढउतार मी या प्रवासात अनुभवले. दिल्लीतील नाटकांचा अनुभव आणि भारतातील शिकवण यांमुळे मी वेगळ्या संस्कृतीत आणि भाषेत समरस होऊ शकलो असं मला वाटतं. अत्यंत प्रामाणिक राहून स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी मला मदत केली. इथे मी सुरुवातीला फ्रिलान्स काम करू लागलो, प्रेक्षकांसमोर लाइव्ह परफॉर्म करू लागलो, छोट्या भूमिकांनाही होकार दिला", असं त्याने सांगितलं.

अनुपमने 'ओड टू माय फादर' या चित्रपटात आणि 'डिसेंडंट्स ऑफ द सन' या अत्यंत लोकप्रिय कोरियन सीरिजमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. अनुपम सध्या दक्षिण कोरियात शिक्षण घेत असून लवकरच भारतात परतणार असल्याचं त्याने सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: लाल किल्ल्यावरून सांगतो त्यांची प्रतिष्ठा वाढलीच पाहिजे.. अदानी अंबानीवर विचारलेल्या प्रश्नावर मोदींचे छातीठोक उत्तर

Chandu Champion : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर; चित्रपटातील 'त्या' सीनचं सिक्रेट कार्तिकने केलं उघड

Instagram Post Delete : इंस्टाग्रामच्या पोस्ट एकावेळेस एका क्लिकमध्ये डिलीट करायच्या आहेत? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Sangli Crime : गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 'शिवप्रतिष्ठान'कडून कॅफेची तोडफोड

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फॉर्मवर दाखल

SCROLL FOR NEXT