Hridaynath Mangeshkar hospitalized News Updates sakal
मनोरंजन

पंडित हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात..

ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नीलेश अडसूळ

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन होऊन दोन महिने उलटून गेले असतानाच मंगेशकर कुटुंब पुन्हा चिंतेत आहेत. गेले काही दिवस पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती बरी नसल्याची बाब समोर आली आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Hridaynath Mangeshkar hospitalized News Updates)

रुग्णालयात दाखल करण्यामागचे खरे कारण समोर आले नसले तरी गेली काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. हृदयनाथ मंगेशकर हे भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांचे धाकटे भाऊ आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यात आदिनाथ मंगेशकर यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. यावेळी आदिनाथ मंगेशकर यांनी वडिल पं. हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.

षण्मुखानंद सभागृहातील सत्कार समारंभात भाषण करताना हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ म्हणाला, 'गेल्या कित्येक वर्षांपासून माझे वडील पंडित हृदयनाथ मंगेशकर हे या कार्यक्रमाचे बीजभाषण सादर करतात. त्यासोबत ते संस्थेचा लेखाजोखा मांडतात. पण यावर्षी ते इथे उपस्थित राहू शकले नाही. कारण त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवाच्या कृपेने ते येत्या १० ते १२ दिवसात घरी परततील.' सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणाही होत आहे. अशी माहिती समोर आली आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे ८४ वर्षांचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT