Hrithik Roshan Fighter Actor comment on Vidhu Vinod Chopra 12 th Fail  esakal
मनोरंजन

'Hrithik Roshan Post : '12 th फेल' पाहिल्यानंतर 'फायटर' ऋतिक झाला भावूक, काय म्हणाला माहितीये?

१२ वी फेल प्रदर्शित झाल्यानंतर तो एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल असे अनेकांना वाटले नव्हते.

युगंधर ताजणे

Hrithik Roshan Fighter Actor comment on Vidhu Vinod Chopra 12 th Fail : १२ वी फेल प्रदर्शित झाल्यानंतर तो एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल असे अनेकांना वाटले नव्हते. पण दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये प्रेक्षक माझ्या या चित्रपटाचे भरभरून स्वागत करतील, असे वक्तव्य केले होते. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं मोठी कमाई केल्याचे दिसून आले.

बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांकडून १२ वी फेलचे कौतुक करण्यात आले. त्यात आता फायटर फेम ऋतिक रोशनच्या नावाची देखील भर पडली आहे. त्यानं १२ वी फेल विषयी एक्स अकाउंटवर खास पोस्ट शेयर केली आहे. त्यातून त्यानं त्या चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती पोस्ट लिहिताना ऋतिक भावूक झाल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

अखेर मी १२ वी फेल पाहिला. तो चित्रपट पाहिल्यानंतर एक मास्टरक्लास कलाकृती पाहिल्याचा आनंद झाला. त्या चित्रपटातील अनेक गोष्टींनी मी खूपच प्रभावित झालो. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास त्यातील साऊंड आणि साऊंड इफेक्ट्स तुम्हाला प्रभावित करणारे आहेत. मला मिस्टर चोप्रा यांचे खास कौतुक करायचे आहे.त्यांनी खूपच उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

ऋतिकच्या त्या पोस्टनंतर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. १२ वी फेल मध्ये ज्या कलाकारांनी काम केले त्यांचेही कौतुक, एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर मी प्रभावित झालो. असेही ऋतिकनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ऋतिकच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा आणि दीपिकाचा फायटर नावाचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ जानेवारी रोजी तो प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यातील ऋतिक आणि दीपिकाचा कडक अंदाज चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT