fighter day 3 box office collection better than opening hrithik roshan esakal
मनोरंजन

Fighter Movie Collection : हृतिकच्या 'फायटर' ची तिसऱ्या दिवशीही जोरदार 'फाईट', बॉक्स ऑफिसवर धमाका!

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक अन् दीपिकाच्या फायटर या चित्रपटानं आता बॉक्स ऑफिसवर वेगळी छाप उमटवली आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

fighter day 3 box office collection better than opening hrithik roshan : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक अन् दीपिकाच्या फायटर या चित्रपटानं आता बॉक्स ऑफिसवर वेगळी छाप उमटवली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला ग्रँड ओपनिंग मिळाली होती. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटरनं तिसऱ्या दिवशी जोरदार कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

गुरुवारी प्रदर्शित झालेल्या फायटरला सुरुवातीला कमाईसाठी संघर्ष करावा लागला. मात्र त्याचे रिव्ह्यू आणि सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियांनी हृतिक अन् दीपिकाच्या केमिस्ट्रीचे कौतुक केल्याचे दिसून आले आहे. हे दोन्ही सेलिब्रेटी पहिल्यांदाच फायटरच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. फायटरच्या व्हायरल झालेल्या ट्रेलर अन् टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्याविषयी बोलायचे झाल्यास त्यांचा गेल्या वर्षी पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात किंग खान शाहरुखची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल एक हजार कोटींची कमाई करुन नवा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यानंतर त्यांच्या फायटरची चर्चा होती. देशभक्तीपर चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ आनंद यांची ही कलाकृतीही प्रेक्षकांची दाद मिळवताना दिसत आहे.

फायटरमधील अॅक्शन सीन्स, त्यातील ग्राफीक्स, व्हिएफएक्स आणि कलाकारांचा अभिनय याचे कौतुक होताना दिसत आहे. त्याला प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची हॉलीवूडमधील टॉम क्रुझच्या टॉप गन नावाच्या चित्रपटासोबत तुलना होत होती. त्यावर दिग्दर्शकानं नेटकऱ्यांना खडे बोल सुनावले होते.

फायटरच्या कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटानं पहिल्याच दिवशी २५ कोटींची कमाई केली होती. अशी कमाई हृतिकच्या दहा वर्षांपूर्वी आलेल्या अग्निपथ, बँग बँग आणि क्रिश ३ ला मिळाली होती. त्यानंतर त्याच्या आलेल्या वॉर नावाच्या चित्रपटानं हे चित्र बदलले होते. दुसऱ्या दिवशी फायटरनं मोठी कमाई केली आहे. त्याच्या कमाईच्या आकड्यात ७० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

शनिवारी या चित्रपटानं २८ ते ३० कोटींची कमाई केल्याचे बोलले जात आहे. आज तकनं याविषयी सविस्तर वृत्त दिले आहे. ट्रेड रिपोर्टच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत हा चित्रपट विक्रमी कमाई करेल. प्रदर्शित झाल्यापासून फायटरनं तीन दिवसांत ९६ कोटींची कमाई केली आहे.

रविवारी हा चित्रपट १०० कोटींच्या घरात इंट्री करेल असे बोलले जात आहे. फायटर हा देशभरातील छोट्या शहरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT