HRITIK SISTER 
मनोरंजन

हृतिक रोशनच्या बहिणीचा डान्स पाहिलात का?

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  सोशल मीडियावर सेलिब्रिटींसोबतच त्यांचे कुटुंबीय देखील चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच सुहाना खानची मामे बहीण चर्चेत आली होती. त्यानंतर आता अभिनेता हृतिक रोशनची बहीण चर्चेत आली आहे. हृतिकने इन्स्टाग्रामवर त्याची चुलत बहिण पश्मिना रोशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे पश्मिना चर्चेत आली आहे.

पश्मिना रोशन ही हृतिकची चुलत बहीण असून तिच्या वाढदिवसानिमित्त हृतिकने तिचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच तिच्यासाठी खास पोस्ट देखील लिहिली आहे. पश्मिना ‘बाजीराव- मस्तानी’ या सिनेमातील 'मोहे रंग दो लाल' या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. विशेष म्हणजे या गाण्यावर ताल धरताना पश्मिनाची देहबोली,  तिच्या चेहऱ्यावरील हावभाव हे खरंच वाखाणण्याजोगे आहेत. त्यामुळे सध्या तिचा हा व्हिडीओ हृतिक रोशनच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

हृतिकने हा डान्स व्हिडिओ शेअर करताना लिहिलंय 'तू खरंच एक स्टार आहेस पश्मिना. मग ते ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन. अशीच आनंदात राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा'. हृतिकने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच गाजलाय. या व्हिडीओवर चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय.

hrithik roshan has posted a dance video of his sister pashmina wrote you are a star  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC निवडणुकांचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला! ८०% कर्मचारी निवडणूक ड्युटीवर, मतदान महत्त्वाचे की उपचार?

Latest Marathi News Live Update : नवी दिल्लीत 'दहशतवादविरोधी परिषद-२०२५' चे उद्घाटन

Viral Video: ''ले बेटा.. किरीश का सुनेगा गाना'', तुम्ही व्हिडीओ बघितला का? कोण आहे तो व्हायरल बॉय?

Akola Political : अकोल्यात भाजप व काँग्रेसची ‘बार्गेनिंग’ वाढली; फॉर्म्युला ठरेना; उमेदवारांची धाकधुक वाढली!

Dream Job Loss: अपयश नाही, नवी संधी! स्वप्नातील नोकरी गेल्यावर नव्याने सुरुवात कशी कराल? 'या' टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT