Hrithik Roshan  esakal
मनोरंजन

Hrithik Roshan : हृतिक चाहत्याचे पाय पडला, सोशल मीडियावर लोकांकडून कौतूक

अभिनेता हृतिक रोशन एका कार्यक्रमाच्या मंचावर त्याच्या एका चाहत्याचे पाया पडला.

सकाळ डिजिटल टीम

Hrithik Roshan Touches Fan Feet : शनिवारी एका फिटनेस इव्हेंटमध्ये पोहोचलेला बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन या कार्यक्रमाच्या मंचावर त्याच्या एका चाहत्याचे पाया पडला. याबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युजर्स अभिनेत्याच्या कृतीचे कौतुक करुन कमेंट करत आहेत.

हृतिक रोशनने चाहत्याचे पाया पडला

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) केवळ त्याच्या डॅशिंग लूकसाठीच नाही तर त्याच्या उत्कृष्ट वर्तनासाठी देखील तो चाहत्यांमध्ये ओळखला जातो. शनिवारी एका फिटनेस इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या हृतिक रोशनने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो खरोखर प्रामाणिक माणूस आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्याकडून चाहत्यांना प्रमोशनल गिफ्ट गुडी बॅग दिली जात होती.

तेव्हा एका चाहत्याने स्टेजवर जाऊन अभिनेत्याचे पाया पडला. प्रत्युत्तरात हृतिक रोशननेही त्या चाहत्याचे पाया पडला. यामुळे त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्याचे हे हवभाव पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनेत्याला दाद दिली. (Entertainment News)

या कार्यक्रमात हृतिक पिवळा टी शर्ट आणि पांढऱ्या पँटसह पांढऱ्या कॅपमध्ये खूपच स्मार्ट दिसत होता. या कार्यक्रमाचा रिलीज झालेला व्हिडिओ एका पापाराझीने इन्स्टा अकाउंटवर पोस्ट केला आहे. एका चाहत्याने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सवर लिहिले, 'सो स्वीट ऑफ यू हृतिक रोशन! दुसऱ्या एका चाहत्याने व्हिडिओवर कमेंट केली, 'सो डाउन टू अर्थ.' त्याचे कौतुक करताना चाहत्यांनी त्याला 'व्हेरी गुड सुपरस्टार' आणि नाव टॅग केले. सबसे नम्र सुपरस्टार'.

'विक्रम वेधा' चित्रपटात हृतिक वेगळ्या अवतारात

हृतिकने नुकताच त्याचा आगामी चित्रपट विक्रम वेधाचा टीझर शेअर केला आहे. त्याची दमदार अॅक्शन व्यक्तिरेखा या चित्रपटात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तमिळ अॅक्शन थ्रिलरची हिंदी आवृत्ती आहे. याचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री या जोडीने केले आहे. २०१७ मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या हिट तमिळ आवृत्तीमध्ये आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT