Hrithik Roshan & Saba Azad Google
मनोरंजन

पुण्यात कॉन्सर्टसाठी गेलेल्या सबाला हृतिक करतोय 'Miss';म्हणाला'...'

हृतिक रोशन आणि सबा आझाद पोस्टच्या माध्यमातून एकमेकांची नेहमीचत स्तुती करताना दिसतात.

प्रणाली मोरे

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद(Saba Azad) एकमेकांना डेट करतायत याची गेल्या काही दिवसांपासून नुसती चर्चाच सुरू आहे. हे दोघे आपल्या प्रेमाची कबुली कधी देणार याकडे यांचे चाहते चातकासारखे डोळे लावून बसलेयत. सोशल मीडियावर तर या दोघांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून अनेकदा आपल्यातील नात्याची हिंट दिली आहे खरंतर,पण तेवढं पुरेस नाही नं चाहत्यांसाठी. या दोघांच्या एकमेकांसाठी केलेल्या पोस्ट असतात मात्र इंट्रेस्टिंग. आता पुन्हा हृतिकनं सबासाठी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. आणि बापडे चाहते पुन्हा हतिक-सबा आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आस लावून बसलेयत. काय म्हणालाय हृतिक पोस्टच्या माध्यमातून सबाला?

Saba Azad Post image

सबानं पुण्यात तिचा एक इव्हेंट होणार आहे त्याच्या रिहर्सल संदर्भातला व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओत ती स्टेजवर उभी आहे,आणि तिथला संपू्र्ण परिसर तिनं त्यात कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता नेहमीच हृतिक-सबा एकमेकांच्या पोस्टवर स्तुतीसुमंन उधळताना दिसतात. मग सबाच्या या पोस्टवर कमेंट करायला किंवा सबाची स्तुती करायला हृतिक कसा विसरेल बरं? सबानं तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर हृतिकनं लिहिलंय,''तुझं हे पॅशन,वेड अनुभवायला मी तिथे असायला हवं होतं''. तेव्हा सबानंही त्यावर कमेंट केलीय की,''हो माझ्या प्रिय माणसा तु इथे असायला हवं होतंस''.

हृतिक-सबा एकमेकांसोबत डिनर डेटला अगदी हातात घालून जात आहेत,कधी सबा हृतिकच्या घरी लंचसाठी जाताना दिसते तर कधी चक्क हृतिकच्या घरातून सबासाठी जेवणाचे डबे जातात. हृतिकच्या घरच्यांच्याही सबासाठीच्या खास पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खानही सबाला खूप पसंत करते. त्यांच्यात छान बॉन्डिंग आहे. मग असं असताना हृतिक-सबा प्रेम व्यक्त करण्यासाठी इतका का उशिर लावतायत अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT