Hrudayi Preet Jagate zee marathi new serial telecast on 7 november 2022 sakal
मनोरंजन

Hrudayi Preet Jagate: हृदयी प्रीत जागते.. झी मराठी घेऊन येतेय संगीतमय प्रेमकथा

या मालिकेतून एक वेगळीच प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

नीलेश अडसूळ

zee marathi: सध्या मालिका विश्वात प्रचंड तगडी स्पर्धा असून काय नवीन संकल्पना आणि आशय [प्रेक्षकांना देता येईल, यासाठी वाहिन्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच सध्या संगीतमय मालिकांचे वारे वाहू लागले आहेत. झी मराठी वाहिनीने देखील एक अनोखी संगीतमय प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. नुकताच या मालिकेचा ट्रेलर लॉंच झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

(Hrudayi Preet Jagate zee marathi new serial telecast on 7 november 2022)

'हृदयी प्रीत जागते'असे या मालिकेचे नाव असून ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा आहे. ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या मालिकेतील नायिका एक निस्वार्थी, प्रामाणिक आणि आज्ञाधारक मुलगी आहे जी एका नम्र कुटुंबातील आहे. तर नायक प्रचंड हुशार, मोहक मुलगा आहे आणि त्याला पाश्चिमात्य संगीताची आवड आहे. हे दोघेही त्यांच्या स्वभावात आणि जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे.

नायिका कीर्तन गायिका आहे आणि त्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे. तर नायक रॉक बँड परफॉर्मर आहे. ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे. आता हेच संगीत ह्या दोन आत्म्यांना कसं एकत्र आणते हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.

सिद्धार्थ खिरीद आणि पूजा कातुर्डे ही तरुण जोडी ह्या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ह्या मालिकेचे लेखन केलं आहे अभिजीत शेंडे यांनी, तर झी मराठीवर अनेक सुपरहिट मालिका देणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. या मालिकेची निर्मिती केली आहे राजेश जोशी यांनी. ७ नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT