Huma Qureshi On Animal
Huma Qureshi On Animal esakal
मनोरंजन

Huma Qureshi On Animal : 'काय ती मर्दानगी, काय ते संगीत अन्....' हुमा कुरेशीनं केलं रणबीरचं भरभरून कौतुक, काय म्हणाली?

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Huma Qureshi On Animal : बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटानं मोठा धुमाकूळ घातला होता. त्या चित्रपटाचे नाव अॅनिमल. ( Animal Movie) संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटानं प्रेक्षकांची (Animal Movie Latest News) मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली होती. आता हुमा कुरेशीनं त्यावरुन प्रतिक्रिया दिली आहे.

बॉक्स ऑफिसवर तब्बल आठशे कोटींची कमाई करणाऱ्या अॅनिमल या (Latest Entertainment news) चित्रपटाचं जेवढं कौतुक झालं तेवढीच त्याच्यावर टीकाही करण्यात आली. त्यात बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश होता. जावेद अख्तर, कंगना, किरण राव यांचे नाव घ्यावे लागेल. आता हुमानं त्या चित्रपटावरुन दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

हुमानं इंडिया टुडेशी बातचीत करताना अॅनिमलविषयी काही विचार स्पष्ट केले आहेत. ती म्हणते, हा चित्रपट मला खूपच आवडला. मी तो चित्रपट खूपच इंजॉय केला. मला त्यातील रणबीरचा मर्दानगी, त्याची अॅक्शन अन् संगीत हे सारं काही खूपच आवडलं. ही एका वेगळ्या प्रकारची फिल्म आहे. मला असं वाटतं की, अशा प्रकारचे चित्रपट आणखी तयार व्हायला हवेत. बाकी सगळं काही ऑडियन्सवर अवलंबून आहे, की त्यांनी काय पाहायचे.

हुमानं म्हटले आहे की, मला देखील या चित्रपटानं प्रचंड भुरळ घातली. मलाही त्या चित्रपटाप्रमाणे हातात मशीन गन घ्यायची आहे. ज्यानं मी खूप साऱ्या लोकांवर गोळीबार करु शकेन.अशा गोष्टींचा तुम्ही भाग होणं हे खूपच भन्नाट असतं. किमान तो अनुभव तरी घ्यायला नको का, मला अशा एखाद्या चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल. अॅनिमलविषयी बोलायचे झाल्यास त्यात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

गेल्या वर्षी एक डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो २६ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर देखील त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट प्रचंड वादाचा विषय ठरला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT