Varsha Dandale  Instagram/Varsha Dandale
मनोरंजन

अपघातानंतर मराठी अभिनेत्री अंथरुणाला खिळून; गमावले अनेक प्रोजेक्ट्स

वर्षा दांदळे यांची 'नांदा सौख्य भरे' मालिकेतील 'वच्छी आत्या' ही भूमिका खूपच गाजली.

स्वाती वेमूल

वर्षा दांदळे यांची 'नांदा सौख्य भरे' मालिकेतील 'वच्छी आत्या' ही भूमिका खूपच गाजली.

मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वर्षा दांदळे Varsha Dandale यांचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला. भंडारदराहून एका पुरस्कार सोहळ्यातून मुंबईला परतत असताना त्यांचा हा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना दुखापत झाली असून तेव्हापासून त्या अंथरुणालाच खिळून आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांची व्यथा मांडली. अपघातानंतर अनेक प्रोजेक्ट गमावल्याचं दु:ख त्यांनी व्यक्त केलं. Varsha Dandale accident

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्या अपघाताविषयी म्हणाल्या, "मी एका पुरस्कार सोहळ्यातून परत येत होते. माझ्या कारमध्ये इतरही काही कलाकार होते. मुंबईला कोणत्या मार्गाने जायचं याची माहिती वाटेकरूंना विचारता यावं, म्हणून आमची कार रस्त्याच्या कडेने कार चालवली जात होती. अचानक आमची कार खड्ड्यात पडली आणि आमचा भीषण अपघात झाला. त्यानंतर पुढे काय झालं, ते मला आठवत नाही. मला कोणाचाच आवाज ऐकू येत नव्हता. माझ्यासोबत असलेले इतरही कलाकार जखमी झाले."

अपघातानंतरच्या परिस्थितीविषयी त्या पुढे म्हणाल्या, "सध्या मी अंथरुणालाच खिळून आहे. पायांवर ताण न देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अपघातानंतर माझ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. माझ्या डाव्या पायालाही दुखापत झाली आहे. माझ्यासारख्या कलाकाराला अशा पद्धतीने अंथरुळाला खिळून राहावं लागणं, हे अत्यंत निराशाजनक आहे. मला काम करायला आवडतं. कामाशिवाय असं राहणं मला आवडत नाही. अपघातानंतर मी काही वेब सीरिज आणि प्रोजेक्ट्स गमावले. मला बरं व्हायला अजून तीन ते चार महिने लागतील. निर्माते इतका काळ थांबू शकत नाहीत."

"मी अजूनही सकारात्मक आहे. कारण माझे कुटुंबीय माझ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत आणि या परिस्थितीतून जाण्यासाठी ते माझी मदत करत आहेत, माझी काळजी घेत आहेत. त्यामुळे मी लवकरात लवकर बरी होऊन पुन्हा कामाला सुरुवात करेन अशी मला आशा आहे", असं त्या म्हणाल्या.

वर्षा दांदळे यांची नांदा सौख्य भरे मालिकेतील 'वच्छी आत्या' ही भूमिका खूपच गाजली. त्यांनी पाहिले न मी तुला, नकटीच्या लग्नाला यायचं हं, घाडगे अँड सून, कृपा सिंधू यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT