मनोरंजन

'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय प्रेक्षक आणि क्रिकेट यांचं अगदी दृढ नातं आहे. हेच  नातं एका वेगळ्या रूपात 'मी पण सचिन' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर  येणार आहे. स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही थांबवू नका, असा आशावादी विचार या चित्रपटातून व्यक्त होत आहे.

एक सामान्य तरुण, त्याचा आत्मविश्वास आणि त्याची मेहनत यांच्या जोरावर अशक्य वाटणारे त्याचे स्वप्न अप्रत्यक्षपणे कसे साकार करतो त्याची गोष्ट म्हणजे 'मी पण सचिन' हा चित्रपट. गावात राहणारा एक तरुण, लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याची असणारी लढाई, हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे.

ट्रेलर मध्ये स्वप्नील तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन वेगवेगळ्या रूपात समोर येत आहे. ह्या चित्रपटांमध्ये अनेक बड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. 

इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या 01 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे  या चित्रपटाचे निर्माता आहे. तर श्रेयश जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने श्रेयश जाधव हे दिग्दर्शनात देखील पाऊल टाकत आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT