मनोरंजन

'काय बोलायचं नाय मी अमिताभची मुलगी'; पोलीस स्टेशन घेतलं डोक्यावर

मनोरंजन विश्वामध्ये कधी काय होईल याचा भरवसा नाही. सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मनोरंजन विश्वामध्ये कधी काय होईल याचा भरवसा नाही. सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका महिलेनं आक्रमक होत पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. बिहार पोलीस ठाण्यातील पोलीस त्या माहिलेचं रुद्ररुप पाहून गोंधळून गेले आहेत. तिनं आपण साक्षात महानायक अमिताभ बच्चन (Film Star Amitabh Bachchan) यांची मुलगी असल्याची बतावणी करुन पोलीस स्टेशन डोक्यावर घेतले आहे. बिहारमधील भोजपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्याचं झालं असं की, एका महिलेला पोलिसांनी अटक केली. आणि तिचा जबाब घेण्यासाठी जेव्हा तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा तिनं आपण अमिताभ बच्चन यांची मुलगी असल्याचे सांगितलं. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. त्यांना त्यावर काय बोलावे हे कळेना. ही घटना बिहारमधील आरा पोलीस स्टेशनची आहे. जेव्हा पोलिसांना तिनं दिलेल्या उत्तरावर विश्वास बसला नाही तेव्हा त्यांनी पुन्हा तिला त्याच प्रश्नाची विचारणा केली. त्यावर तिनं हरिवंशराय बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचे नाव सांगितले. काही वेळानं त्यांना असे दिसून आले की, त्या महिलेची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे ती अशाप्रकारची उत्तरं देत आहे.

ही घटना आहे रविवारची. दुपारचे तीन वाजले होते. त्यावेळी एक महिला पोलीस अधिकारी ड्युटीवर होती. तेव्हा एक महिला मोठमोठ्यानं रडत पोलीस स्टेशनमध्ये आली. तिनं आपल्या घरात मोठ्या शिस्तीचं वातावरण आहे. त्यात आपली जीव रमत नाही. मला त्यातून सोडवा अशी विनवणी पोलिसांना केली. यावर पोलिसांनी तिला तिचं नाव विचारलं. या प्रश्नाचे उत्तर देताना आपण अमिताभ बच्चन यांची मुलगी असल्याचे सांगत पोलिसांचीच फिरकी घेण्यास सुरुवात केली. तिच्या त्या उत्तरानं पोलीस चक्रावून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT