Salman Khan Google
मनोरंजन

सलमानची चेली गेली त्याच्याच विरोधात;म्हणाली, 'मला माकड नाही बनायचं'

अभिनेत्रीनं दबंग खानसाठी केलं मोठं विधान....

प्रणाली मोरे

अनेक अभिनेत्रींचा पाठीराखा,गॉडफादर म्हणून सलमान खान (Salman Khan)ओळखला जातो. अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे फक्त रूप होतं पण अभिनयाच्या बाबतीत त्या फार काही करून दाखवतील अशी आशा नसूनही केवळ सलमाननं सहकार्य केलं म्हणून त्यांना बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळाला किंवा त्यांचं थांबलेलं करिअर पुन्हा रुळावर आलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांची नाव काढायला गेलं तर लांबलचक लिस्ट त्या नावांची तयार होईल यात शंकाच नाही. आता या अनेक अभिनेत्रींचं नाव सलमान सोबत जोडलं गेलं होतं हे वेगळं सांगायला नको. अनेकजणी तर अगदी सलमानच्या प्रेमातही पडल्या पण सलमाननं अगदी तांदळात खडा पडावा तसं अलगद उचलून गळ्यात पडणाऱ्या त्यांना आपल्या आयुष्यातून काढून बाहेर फेकून दिलं. त्या सगळ्याच आता गायब झाल्या.

पण काहीजणी अजूनही बॉलीवूडमध्ये स्ट्रगल करीत तग धरून उभ्या आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री आता पुढे आली आणि एका मुलाखतीत तिनं असं काही विधान केलं की ते आता तिला भारी पडतंय की काय असं वाटू लागलंय. ती अभिनेत्री थोडीफार कतरिना कैफ सारखी दिसते. म्हणजे तंस २०१० साली ती सलमानसोबत त्याच्या 'वीर' सिनेमातनं बॉलीवूडमध्ये लॉंच झाली . हो,बरोबर ओळखलंत. तिचं नाव आहे झरीन खान(Zareen Khan). झरीन खानला त्यावेळी सलमान खाननेच ब्रेक दिला होता. पण 'वीर' हा सिनेमा फार काही चालला नाही. त्यामुळे झरीनला देखील हवेतसे सिनेमे मिळाले नाहीत हे सत्य. आज दहा-अकरा वर्षात तिच्या नावावर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमे आहेत आणि ते सगळे बऱ्यापैकी फ्लॉप ठरलेले. झरीन अजूनही स्ट्रगल करतेय. त्यात सलमाननं तिच्याकडे पाठ फिरवली आहे. पण अशातच तिनं आता दबंग खानविरोधात एक वक्तव्य केलंय ज्यामुळे कदाचित तिच्या करिअरमध्ये मोठी अडचण येऊ शकते.

Zareen Khan

तिला एका मुलाखतीत सलमानवरुन छेडलं असता ती म्हणाली,''माझा पहिला सिनेमा मला सलमानमुळे मिळाला हे खरं आहे. पण खरंतर माझं स्ट्रगल हे त्या सिनेमानंतर सुरू झालं. मी सलमान किंवा त्याच्या भावांच्या पाठीवरचं माकड नाही,किंवा मला ते बनायचंही नाही''. आता हे म्हणून झरीननं सलमानशी एकप्रकारे पंगाच घेतला आहे म्हणायचा. आता सलमानच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर भल्याभल्यांचं बॉलीवूडमधलं करिअर डूबलंय. विवेक ओबेरॉय हे मोठं उदाहरण आहेच की डोळ्यासमोर. तेव्हा झरीननं आता आपल्या करिअरची डूबती नय्या कशी वाचेल याकडे लक्ष दिलं तर बरं होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT