Priyanka Chopra,Dia MIrza Google
मनोरंजन

''मला विश्वास नाही बसत की तू माझ्याबाबतीत असं काही पोस्ट करू शकतेस''

प्रियंका चोप्राच्या कोणत्या पोस्टवर दिया मिर्झानं अशी प्रतिक्रिया दिलीय ...

प्रणाली मोरे

प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra) आणि दिया मिर्झा(Dia Mirza) या दोघीही बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री. त्यात प्रियंकानं थेट हॉलीवूडपर्यंत मजल मारली आहे आणि दिया मिर्झा आता आपलं मातृत्व एन्जॉय करीत आहे. पण या दोघींचं कनेक्शन हे बॉलीवूडच्या आधीपासनं एकमेकींशी आहे बरं का. या दोघीही पहायला गेलं तर सौंदर्य स्पर्धांमधून पुढे आलेल्या. २००० साली दोघींनीही अनुक्रमे 'मिस वर्ल्ड' आणि 'मिस एशिया पॅसिफीक' हे किताब जिंकले होते. त्याचवेळी लारा दत्तानंही 'मिस.युनिव्हर्स' हा किताब पटकावला होता. तर असं एकंदरीत यांच्यातलं कनेक्शन. पण असं काय झालं की आज अनेक वर्षांनी प्रियंकानं दिया मिर्झासंदर्भात काहीतरी पोस्ट केलं आणि त्याची चर्चा झाली.

Priyanka Chopra,Dia Mirza

प्रियंकानं दिया मिर्झाचा जवळ-जवळ २२ वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा फोटो शेअर करण्याचं निमित्त होतं दियाचा नुकताच पार पडलेला चाळीसावा वाढदिवस. बरं,प्रियंकानं जो फोटो शेअर केलाय तो फोटो आहे दियाच्या अठराव्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा. ज्यात दियाच्या चेह-याला केक फासलेला दिसत आहे. प्रियंकानं हा फोटो शेअर करीत दिया मिर्झाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटलंय,''मिस.इंडिया स्पर्धेच्या आधी तुझ्या अठराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं काढलेला फोटो. हॅपी बर्थ डे दी!'' तर दियानंही प्रियंकाच्या पोस्टवर कमेंट करीत म्हटलंय की,''माझा विश्वास बसत नाहीय हा फोटो तुझ्याकडे अजूनही होता''. आणि दियानं तोंड लपवणारा इमोजी त्या कमेंटबॉक्समध्ये पोस्ट केलेला आहे.

प्रियंका आणि दिया नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मुलाखतींमधनं एकमेकींविषयी चांगलं बोलताना दिसतात. मागे एका मुलाखतीत प्रियंकाच्या हॉलीवूड जर्नी विषयीही दिया भरभरून बोलली होती. दियानं नुकताच आपला ४० वा वाढदिवस आपल्या कुंटुंबासोबत सेलिब्रेट केला. तिला नुकताच एक मुलगा झाला आहे. सध्या ती बॉलीवूडपासनं लांब राहून आपल्या मुलासोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. ती नेहमीच आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT