I love Uddhav Singer Lucky Ali ki Post on maharashtra politics sakal
मनोरंजन

'आय लव्ह उद्धव..' महाराष्ट्राच्या राजकारणावर काय म्हणले लकी अली..

गायक लकी अली पोस्ट लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

नीलेश अडसूळ

maharashtra politics : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांची वाट पुन्हा शिवसेनेकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत परंतु एकनाथ यांची बाजू अधिकच भक्कम होत चालली आहे. आता पर्यंत 40 हुन अधिक आमदारांचा पाठिंबा त्यांच्याकडे आहे. काही खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूणच राजकीय स्थिती पूर्णतः ढवळून निघाली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्या परिस्थितीवर अत्यंत संयमीपणे भाष्य करत आहेत. त्यांच्या या शैलीवर अनेकजण खुश झाले आहेत. याच संदर्भात ज्येष्ठ गायक लकी अली यांनी एक पोस्ट लिहिली आहे. (I love Uddhav Singer Lucky Ali ki Post on maharashtra politics) (lucky ali post)

महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लागतंय ते लक्षात येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्याला रामराम ठोकला. हजारो शिवसैनिकांच प्रेम घेत ते मातोश्रीवर परतले. गेल्या अडीच वर्षातील कामावर, तब्येतीवर त्यांनी त्यांत संयमी भाष्य केले. सत्येचा मोह नाही असे उघडपणे सांगितले. शिवाय कालच्या भाषणात त्यांनी खरी शिवसेना काय आहे, शिवसैनिक कोण आहे, बंडखोरांवर ते भरभरून बोलले. त्यांच्या या स्वभावाचे आता कौतुक केले जात आहे. त्यात गायक लकी अली यांच्या पोस्ट ची विशेष चर्चा आहे.

लकी अली यांनी फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं “आय लव्ह उद्धव, मी त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर करत आहे. विषय संपला.' अशा शब्दात कौतुक केलं आहे. गेल्या वर्षी लकी अली यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुंबई योग्य व्यक्तीच्या हातात असल्याचं त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळीही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. आदित्य ठाकरे मला गाडीपर्यंत सोडायला आले, त्यांनी गाडीचा दरवाजा उघडून दिला म्हणजे ज्येष्ठांबद्दल त्यांचा आदर दिसून येतो, असंही अली म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT