Mahesh Bhatt Google
मनोरंजन

''त्या विचित्र नजरांनी माझं करिअर संपवलं असतं;महेश भट होते म्हणून..''

'या' अभिनेत्रीने मुलाखती दरम्यान सांगितली बॉलीवूडमधील सुरुवातीच्या दिवसांची व्यथा....

प्रणाली मोरे

'अर्थ','सारांश','सडक','आशिकी','जख्म','दिल है की मानता नही' असे एकापेक्षा एक सरस सिनेमे करणारा दिग्दर्शक-निर्माता म्हणून महेश भट(Mahesh Bhatt)यांच्याकडे पाहिलं जातं. ते त्यांच्या सिनेमांमुळे जितके चर्चेत आहेत तितकेच त्यांच्या एक्स्ट्रामॅरिटल अफेअर आणि वादग्रस्त विधानांमुळेही चर्चेत राहिले. आता त्यांच्या जमान्यातील देखणी अभिनेत्री परविन बाबीसोबतचं त्यांचं गाजलेलं नातं एकवेळ आपण ठीक आहे म्हणून सोडून देऊ शकतो पण आताच्या जमान्यातल्याही अभिनेत्रींसोबत त्यांचे नको त्या पोजमधले फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा तोंडावर आणि आपल्या डोळ्यावर हात आपसूक जातो. इतकंच काय तर अगदी त्यांची स्वतःची मोठी मुलगी पुजा भट्ट हिच्यासोबतचा लीपलॉक फोटोनंही गोंधळ माजवला होता. असो,आता असं काही-बाही ज्या महेश भटांबद्दल आपण बोलतोय त्यांनीच बॉलीवूडमधल्या एका करिअर करू पाहणा-या अभिनेत्रीला तिची पहिली फिल्म देऊन तारलं आहे बरं का. बरं,हे तिने बॉलीवूडमध्ये नाव कमावल्यानंतर स्वतःच्या तोंडून मान्य केलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री?जाणून घेऊया चला.

sunny Leone

तर ही दुसरी-तिसरी कुणी नसून आपली सनी लिओन(Sunny Leone) आहे. सनीनं एका मुलाखतीत सांगितलं की,''माझी इमेज ही अॅडल्ट सिनेमांत काम करणारी अभिनेत्री अशी होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बॉलीवूडमध्ये माझ्यावर खूप घाणेरड्या कमेंट्स केल्या जायच्या. माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जायचं. जणू मी विदेशी पुतळा आहे,जो काहीतरी विचित्र दिसतोय अशा त्या नजरा असायच्या. मला कुष्ठरोग झालाय का? असे वाटायचे मला. इतकंच काय तर पत्रकारही माझी मुलाखत घेणं टाळायचे. ब-याचदा मी जेव्हा आमच्या सिनेमाच्या टीमला विचारायचे की इतर कलाकारांच्या मुलाखती झाल्या मग माझी कधी?'' तेव्हा मला सांगण्यात यायचं की पत्रकारांना माझ्यासारख्या अॅडल्ट सिनेमांत काम करून आलेल्या अभिनेत्रीची मुलाखत घेण्यात रस नाही. तेव्हा खूप वाईट वाटायचं.

सनी पुढे म्हणाली,''मी भारतात सिनेइंडस्ट्रीत करिअर करायला आले तेव्हा सुरुवातीला मला 'बिग बॉस ५' ची ऑफर चालून आली. तिथेच मला महेश भट यांनी पाहिलं. तेव्हा त्यांनी मला 'जिस्म २' या सिनेमात मुख्य भूमिका दिली आणि तिथून माझा बॉलीवूड प्रवास थोडासा का होईना सुखकर झाला. लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर मी काही सिनेमांत काम केलं. माझ्या स्वतःच्या आयुष्यावरही एक वेबसिरीज आली. पण मला एवढंच वाटतं की महेश भट होते म्हणून मी माझ्या अॅडल्ट सिनेमाची हिरोईन या ईमेजमधून बाहेर पडू शकले''. सनी लिओन लवकरच आता आपल्याला विक्रम भट यांच्या 'अनामिका' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Trafficking: किडनी विक्री प्रकरणातील एजंट ‘डॉ. कृष्णा’ निघाला इंजिनिअर, सोलापुरात केली अटक; बनावट नावाने पीडित शोधायचा

High BP and Pregnancy: उच्च रक्तदाब असल्यास शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती; कामा रुग्णालयातील डॉक्टरांचा अभ्यास

Jalna Crime: कारमधील मृत्यूचा उलगडा; पंचवीस लाखांची सुपारी देऊन खून, जालन्यातील प्रकरण, दोन संशयितांना पोलिस कोठडी

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ई-पीक पाहणी न झालेल्यांसाठी आता ऑफलाइन नोंद; नेमकं काय करावे लागणार?

Radio Ceylon: रसिकांना रिजवणाऱ्या ‘रेडिओ सिलोन’नेची शताब्दी; भारतासह जगभरात लोकप्रिय, ‘बिनाका गीतमाला’सह गाजले अनेक कार्यक्रम

SCROLL FOR NEXT