aasha bhosale
aasha bhosale 
मनोरंजन

आशा भोसले होत्या हेलनच्या प्रेमात, म्हणाल्या जर मी पुरुष असते तर हेलनसोबत पळून गेले असते..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- गायिका आशा भोसले अनेकदा त्यांच्या गाण्यांमुळेच नाही तर त्यांच्या वक्यव्यांमुळे देखील चर्चेत राहिल्या आहेत.  नुकतंच आशाताईंनी स्वतःचं युट्युब चॅनल लॉन्च केलं आहे. या चॅनलच्या माध्यमातून ते त्यांच्या गाण्यांसोबतंच आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी देखील उलगडणार आहेत. या आठवणींसोबतचं त्या गाण्यांच्या वेळी पडद्यामागे चालणारे, तसेच गाण्याच्यावेळी घडत असलेले किस्से अशा अनेक गोष्टींचा समावेश करणार आहेत. नुकतंच आशाताईंनी त्यांच्या चॅनलवर चाहत्यांशी बोलताना एका मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. 

आशाताईंनी त्यांच्या चाहत्यांशी बोलताना सांगितलं की, त्यांना बॉलीवूडची डान्सिंग क्वीन समजली जाणारी सुंदर हेलन खूप आवडायची. इतकंच नाही तर जेव्हा त्या रेकॉर्डिंग स्टुडियो मध्ये जायच्या तेव्हा त्या गाणं थांबवून हेलनला निरखत बसायच्या. हेलन यांच्या प्रेमात वेड्या झालेल्या आशातईंनी सांगितलं की, त्यांनी हेलनला रिक्वेस्ट केली होती की जेव्हा रेकॉर्डिंग असेल तेव्हा हेलन यांनी स्टुडिओमध्ये येऊ नये. यासोबतंच आशाताई म्हणाल्या होत्या की जर मी पुरुष असते तर कदाचित हेलनसोबत पळून गेले असते. 

आशाताईंनी आपल्या चॅनेलबाबत बोलताना सांगितलं, या चॅनलवर मी केवळ माझे अनुभवंच नाही तर आर.डी. बर्मन यांच्यासोबत रेकॉर्ड केलेली अनेक गाणी देखील रिलीज करणार आहेत जी कधीच कोणत्या सिनेमात आजपर्यंत वापरली गेली नाहीत. त्यामुळे आशाताईंच्या या चॅनलमधून अनेक किस्से उलगडणार असल्याने अनेकांना त्याची उत्सुकता आहे. 

काही दिवसांपूर्वीच गायिका आशा भोसले यांनी त्यांचं स्वतःचं युट्युब चॅनल लॉन्च केलं होतं. 'मैहुं' हे पहिलं गाणं त्यांनी त्यांच्या चॅनलवर पहिल्यांदा रिलीज केलं. यानंतरही आता अनेक गाणी त्या रिलीज करणार आहेत. 

i would have eloped with helen if i was a man says singer asha bhosle

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT