Kapil Sharma, Navjot Singh Siddhu, Archana puran Singh
Kapil Sharma, Navjot Singh Siddhu, Archana puran Singh Google
मनोरंजन

The kapil Sharma Show: सिद्धुची घरवापसी? खुर्ची त्यागास तयार अर्चना

प्रणाली मोरे

'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show) मध्ये सध्या जजच्या खूर्चीत आपण सारे अभिनेत्री अर्चना पुराण सिंग(Archana Puran Singh) हिला पाहत आहोत. पण या खुर्चीत आधी क्रिकेटर नवजोत सिंग सिद्धु बसायचे. पुढे राजकारणात नशीब आजमावण्यासाठी त्यांनी मनोरंजनाच्या मंचावरील खुर्चीला रामराम ठोकला होता. पण पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांत सिद्धुचा(Navjot SIngh SIdhu) दारुण पराभव झाला असून पंजाबचा मुख्यमंत्री बनायचं त्याचं स्वप्नही गंगेला जाऊन मिळालं आहे. त्यामुळे आता सर्वच स्तरातून,सर्वात जास्त सोशल मीडियावर एक सूर सर्वाधिक उमटत आहे तो म्हणजे राजकारणात खूर्चीनं हुलकावणी दिल्यानंतर आता पुन्हा सिद्धु मनोरंजानाच्या मंचावरील खुर्चीवर आपला अधिकार दाखवणार अन् अर्चनाला 'कपिल शर्मा शो' मधनं बाहेर पडावं लागणार.

ज्या दिवशी देशभरातील पाच राज्यातून निवडणूकांचे निकाल लागले अन् त्यात पंजाबमध्ये सिद्धुचा दारुण पराभव झाला तेव्हा सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. केवळ बातमी नाही तर मजेदार मीम्स व्हायरल झाले होते. मीम्सच्या माध्यमातून म्हटलं गेलं होतं की सिद्धु 'कपिल शर्मा शो' मध्ये परत येणार त्यामुळे अर्चना पुराण सिंगचे धाबे दणाणले आहेत. या मीम्सना त्या दिवशी जोरदार पसंती मिळाली. अर्थात सिद्धुनं अद्याप पुढे काय करणार याविषयी काही बोललं नसल्याने या मीम्सवर सर्वसामान्यांनी विश्वासही ठेवला.

पण एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना अर्चना पुराण सिंगनं या मीम्सविषयी आणि त्या बातमीविषयी स्पष्टिकरण दिलं आहे. तिनं म्हटलंय,''सिद्धुला जर 'कपिल शर्मा शो' मध्ये परत यायचं असेल,त्यानं तशी इच्छा बोलून दाखवली तर मी कधीही तयार आहे शो मधून बाहेर पडण्यासाठी. मला खूर्चीचा मोह नाही''. आता अर्चनानं जाहिरपणे हे स्पष्ट केल्यानं नवजोत सिंग सिद्धु यावर काय म्हणतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; पोलीस ॲक्शन मोडवर

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

उतावळा नवरा! लग्नाच्या दोन महिने आधीच मुलीच्या घरी गेला अन् गोंधळ घातला, पोलिसांनी थेट...

Entertainment News: "मी मेकअप रुममध्ये कपडे बदलत असताना..."; अभिनेत्रीनं सांगितला मालिकेत काम करताना आलेला धक्कादायक अनुभव

अयोध्येत बसमधून ९५ बालकांची CWC ने केली सुटका, सर्व मुलं ५ ते ९ वयोगटातील

SCROLL FOR NEXT