Viral Video:अमिताभ बच्चन यांना भारी पडतेय नात आराध्या Aaradhya Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan With grandaughter Aardhya Bachchan

Viral Video:अमिताभ बच्चन यांना भारी पडतेय नात आराध्या

बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलं नेहमीच प्रकाशझोतात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे येतच असतात. ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Bachchan) आणि अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) यांची मुलगी आराध्या(Aaradhya Bachchan) याला अपवाद कशी ठरेल बरं. अनेकादा तिच्यातील चांगल्या गुणांमुळे ती चर्चेत असते तर कधी ट्रोलर्स उगाचच त्या छोट्या मुलीवर आपला टीकेचा निशाणा साधताना दिसतात. पण मागे अभिषेकनं चांगलंच सुनावलं होतं अशा ट्रोलर्सना. असो,आराध्यानं तिच्या गोड वागणुकीतनं अनेकांची मनं जिंकलीसुद्धा आहेत. कधी तिच्यातील नृत्यकलेनं अनेकांना तिचं फॅन आतापासनंच बनवलंय तर कधी तिच्या तडफदार अस्खलीत इंग्रजी भाषणाचे व्हिडीओ प्रशंसेस पात्र ठरलेयत.

आता पुन्हा एकदा आराध्या चर्चेत आहे ते तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे. या व्हिडीओत तिचं हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहता सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या व्हिडीओला डोक्यावर उचलून धरलंय. सारेच तिच्या हिंदी भाषेच्या प्रेमात पडलेयत. थेट नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन(Amitabh Bahcchan) आणि ऐश्वर्या राय-बच्चनशी तिची तुलना केली आहे. आराध्याच्या त्या व्हायरल व्हिडीओवरनं नेटकऱ्यांनी आराध्याच्या आवाजाची तुलना थेट अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे. आजी-आजोबांच्या संस्कारांची ही जादू आहे अशी प्रतिक्रिया नेटकरी त्या व्हिडीओवर देत आहेत.

हेही वाचा: 'आमिरनं दोन्ही घटस्फोटांसाठी जबाबदार ठरवलय ...'; वाढदिवशीच केला खुलासा

अनेक नेटकऱ्यांनी म्हटलंय,'आई ऐश्वर्यासारखाच आत्मविश्वास तिच्या बोलण्यात,वागण्यात आहे'. काहींनी लिहिलंय,'तिच्या रक्तात हे संस्कार आहेत. आत्मविश्वास आणि अभिव्यक्त होण्याचे गुण तिनं ऐश्वर्याकडून घेतले आहेत.आणि स्पष्ट हिंदी उच्चार,आवाजातला दरारा तिनं अमिताभ बच्चन यांच्याकडून घेतला आहे'. 'मोठी झाल्यावर ती एक उत्तम माणूस बनेल', अशी देखील काही नेटकऱ्यांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. कोणी म्हटलंय,'ती जन्मतः हुशार असणार.त्यात घरातलं बाळकडू मिळाल्यानं ती अधिकाधिक हुशार बनत चालली आहे'.

Web Title: Aardhya Bachchans Latest Video From Schools Elocution Competition Has Gone Viral Fans Are Comparing Her With Amitabh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top