IFFI 2022 Closing Ceremony esakal
मनोरंजन

IFFI 2022 Closing Ceremony: वाद काश्मिर फाईल्सचा रंगला, पुरस्कारार्थी चिरंजीवी कोपऱ्यात बसला!

गोव्यातील यंदाचा इफ्फी शेवटच्या दिवशी चर्चेत आला. अन्यथा नेहमी प्रमाणे महोत्सव सुरु होता आणि तो संपलाही असता.

सकाळ डिजिटल टीम

IFFI 2022 Closing Ceremony: गोव्यातील यंदाचा इफ्फी शेवटच्या दिवशी चर्चेत आला. अन्यथा नेहमी प्रमाणे महोत्सव सुरु होता आणि तो संपलाही असता. तर रसिक, प्रेक्षक आणि चित्रपट अभ्यासक वगळता त्यावर फारशी चर्चा झाली नसती. यापूर्वी देखील इफ्फीच्या कित्येक महोत्सवानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

इफ्फीचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत होता. गेल्या तीन ते चार दिवस जगभरातील उत्तमोउतम चित्रपटांची अवीट मेजवानी प्रेक्षकांनी अनुभवली त्याचे सार शेवटच्या दिवशी ज्युरी आपल्या भाषणातून सांगत होते. नदाव लॅपिड यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्सवर जी प्रतिक्रिया दिली त्यावरुन हा महोत्सव एकदम चर्चेत आला आहे. त्यांनी हा चित्रपट अश्लील, गलिच्छ असून तो प्रोपगंडा करणारा चित्रपट आहे असे म्हटले होते.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

नदाव यांची प्रतिक्रिया व्हायरल होताच त्यावर वेगानं प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. मात्र यासगळ्यात एक गोष्ट पूर्णपणे दुर्लक्षित राहिली. ती म्हणजे टॉलीवूड चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांना यावेळी ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ इयर’ या पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. चिरंजीवीनं तीन दशकांहून अधिक काळ वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशा दिग्गजाचा गौरव यावेळी करण्यात आला होता.

काश्मीर फाईल्सच्या प्रकरणात मात्र चिरंजीवीचे उस्फुर्त भाषण आणि त्याचा झालेला गौरव पूर्णपणे बाजुला पडल्याचे दिसून आले आहे. यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या सेलिब्रेटीचं मनापासून कौतूक करता आले नाही त्याच्यावर कुणीही फारसं बोललं नाही. प्रसारमाध्यमांनी देखील त्याची दखल घेतली नाही. हे खूप वाईट आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यासगळ्यात चिरंजीवीचं मनोगत चाहत्यांना जिंकून घेणारं ठरलं आहे. तो म्हणाला, मी आज जे काही त्यात माझ्या चाहत्यांचा वाटा महत्वाचा आहे. त्यांच्यामुळे मी आहे. मी त्यांचा गुलाम आहे. त्यांना आणि चित्रपटाला सोडून अन्य दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा मी विचारही करु शकत नाही. मला अनेक राजकारणात येण्याविषयी विचारतात पण मला त्यांना तेच सांगायचे आहे की, चित्रपट सोडून राजकारणात येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात; चार वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT