IFFI 2023 Sunny Deol Bollywood Actor Rajkumar Santoshi  esakal
मनोरंजन

IFFI 2023 : 'बॉलीवूडमध्ये सनीच्या टॅलेंटची कदर झालीच नाही'! प्रसिद्ध दिग्दर्शकानं केलं मोठ वक्तव्य

गोव्यामध्ये सुरु असणाऱ्या आंतरराष्ट्रीय इफ्फी महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे.

युगंधर ताजणे

IFFI 2023 Sunny Deol Bollywood Actor Rajkumar Santoshi : गोव्यामध्ये सुरु असणाऱ्या आंतरराष्ट्रीय इफ्फी महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी सनीविषयी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. याप्रसंगी गदर चे दिग्दर्शक अनिल शर्मा, राहुल खैल हे देखील उपस्थित होते. संतोषी यांनी सनीचं कौतुक केलं आणि सनी भावूक झाल्याचे दिसून आले.

राजकुमार संतोषी यांनी सांगितले की, सनी हा खूप प्रतिभावान अभिनेता आहे. मात्र बॉलीवूडमधून त्याच्या अभिनयाला आणि त्याच्या प्रतिभेला न्याय मिळाला नाही. भलेही इंडस्ट्रीनं त्याच्यातील टॅलेंटची कदर केली नसेल पण देवानं त्याच्यातील गुणवत्ता हेरुन त्याला घडवले. एका मोठ्या दिग्दर्शकाच्या तोंडून आपलं कौतुक ऐकुन सनीलाही राहवलं नाही. आणि त्यानं देखील यावेळी प्रतिक्रिया देत उपस्थितांना जिंकून घेतले.

सनी म्हणाला की, मी खूपच सुदैवी राहिलो आहे. मी राहुल खैल यांच्या फिल्मपासून सुरुवात केली होती. त्यांनी मला तीन सुंदर चित्रपट दिले होते. काही चालल्या तर काही फ्लॉप झाल्या. पण ते चित्रपट आजही लोकांना आठवतात. मी जे काही आहे ते माझे चित्रपट आणि चाहते यांच्यामुळे आहे. यात अनेकांचा मोठा वाटा आहे. मी खूप वेगळ्या प्रकारचे चित्रपट केले पण सध्या चर्चा ही गदर २ची आहे.

गदरचा पहिला भाग आला तो ही प्रचंड यशस्वी झाला होता. प्रेक्षकांची तुफान लोकप्रियता या चित्रपटाला देखील मिळाली होती. मात्र त्यानंतर मी खूप स्ट्रगल करु लागलो. गदर २ साठी तब्बल वीस वर्षांचा संघर्ष करावा लागला. त्यामुळे माझी लढाई खूप मोठी आहे हे मला सांगायचे आहे.

सनीबाबत एक गोष्ट नेहमीच सांगितले जाते ती म्हणजे त्याला आपल्या वडिलांप्रमाणे चित्रपट करायचे होते. पण त्याला तसे चित्रपट मिळाले नाहीत. मला अभिनेताच व्हायचं होतं आणि म्हणून मी या लाईनमध्ये आलो. असेही सनीनं अनेकदा काही मुलाखतींमधून सांगितले होते. खूप मोठा अभिनेता व्हायचं असं स्वप्नं काही सनीनं पाहिलं नव्हतं. पण वडिलांच्या फिल्म पाहून तो जास्त प्रभावित झाला होता.

सनी देओलनं २७ वर्षांपूर्वी राजकुमार संतोषी यांच्यासोबत घायल, घातक सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. सनीनं यावेळी राजकुमार यांच्याबरोबर केलेल्या या चित्रपटांसाठी दोन पुरस्कारही जिंकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT