IIFA Awards 2023 gets postponed Abu Dhabi  esakal
मनोरंजन

IIFA Awards 2023 : बॉलीवूडला मोठा झटका, यंदाचा आयफा अ‍ॅवॉर्डस्...

द इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकेडमी (आयफा) या संस्थेन मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे त्यांनी २३ वा आयफा पुरस्कार पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

IIFA Awards 2023 gets postponed Abu Dhabi : बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या पुरस्कारांची नेहमीच चर्चा असते. फिल्म फेयरचा पुरस्कार, कलर्स पुरस्कार, यामध्ये आयफा पुरस्काराविषयी चाहत्यांना कमालीचे कुतूहल असते. याबाबत एक मोठी बातमी आता समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.

द इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकेडमी (आयफा) या संस्थेन मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे त्यांनी २३ वा आयफा पुरस्कार पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षी फेब्रुवारी २०२३ मध्ये हा पुरस्कार सोहळा अबु धाबीमध्ये पार पडणार होता. तो आता पुढे ढकलण्यात आल्यानं चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Also Read - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

पुरस्कार समितीनं याबाबत त्यांच्या अधिकृत इंस्टा हँडलवर पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, यावेळी फेब्रुवारीमध्ये होणारा आयफा पुरस्काराचा सोहळा मे २६ ते २७ दरम्यान होणार आहे. अबुधाबीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. भारतीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये आयफा पुरस्काराचे स्थान महत्वाचे आहे. तो पुरस्कार मिळवण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रेटींमध्ये चढाओढ लागलेली दिसते.

पुरस्कार सोहळा पुढे का ढकलण्यात आला याचे कारण मात्र समितीकडून देण्यात आलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यंदाच्या आयफा सोहळ्यासाठी डिसेंबर २०२२ पासून नामांकने मागवण्यात आली होती.

भारतीय चित्रपट विश्वाला चालना देणे तसेच अरब देशांमधील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशानं गेल्या काही वर्षांपासून त्या देशांमध्ये या पुरस्काराचे आयोजन मोठ्या भव्य दिव्य स्वरुपात केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT