Ileana D'Cruz, Ileana D'Cruz baby bump. Ileana D'Cruz movies, Ileana D'Cruz baby, Ileana D'Cruz boyfriend, Ileana D'Cruz affair  Esakal
मनोरंजन

Ileana D'Cruz: 'कोण म्हणालं मी सिंगल मदर ', इलियानाच्या पोस्टनं पुन्हा चर्चांना उधाण

बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत माहिती शेअर करत असते.

Vaishali Patil

Ileana D'Cruz shares Romantic Photo With Partner Michael Dolan: बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर चर्चेत आहे. ती सध्या चित्रपटात सक्रिय नसली तरी ती सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कनेक्ट राहते.

ती आता एका गोंडस मुलाची आई झाली आहे. तिने मुलगा कोआ फेनिक्स डोलनला जन्म दिला आहे. इलियाना तिच्या मुलाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता अलीकडेच तिने चाहत्यांसोबत आस्क मी एनीथिंग सेशन घेतलं.

ज्यात तिने तिच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, तिने एक खुलासा केला आहे की, ती आपला मुलगा फिनिक्स डोलनचा सांभाळ एकटीने करत नाही आहे तर तिचा प्रियकर मायकल डोलन देखील तिच्यासोबत आहे.

आस्क मी एनीथिंग सेशनदरम्यान, एका चाहत्याने इलियानाला विचारलं की, 'तू एकटीने तूझ्या मुलाला कसे वाढवत आहेस?' यावर इलियानाने खुलासा केला की, 'जेव्हाही तिच्या मुलाची काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा ती एकटी नसते. या उत्तरासोबत तिने मायकलसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा सोशल मिडियावर तिची चर्चा सुरु झाली आहे.

यासोबतच एका चाहत्याने इलियानाला विचारले की, बेबी कोआ फिनिक्स डोलन व्यतिरिक्त, ती कोणासाठी खरोखर कृतज्ञ आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना इलियाना म्हणाली, 'माझ्या मुलाचा बाबा'.

तर एकानं तिला विचारलं की, 'आई बनून तुला काय आश्चर्य वाटले?' यावर उत्तर देताना तिनं लिहिलं , "मी आई म्हणून किती मजबूत आहे हे मला समजलं".  यासोबतच तिने चाहत्यांच्या बऱ्याच प्रश्नाची उत्तर दिली.

इलियानाने 1 ऑगस्ट 2023 रोजी मुलाला जन्म दिला. त्याचे नाव तिने कोआ फिनिक्स डोलन असे नाव दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

MLA Gopichand Padalkar: 'जयंत पाटील यांच्याविषयी एकही शब्द बोलणार नाही': आमदार गोपीचंद पडळकर; घायवळचे अनेक साथीदार रोहित पवारांचे मित्र

Solapur News:'जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज‌'; जिल्हाधिकाऱ्यांकडून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Sinai River: 'कोळेगाव-आष्टे बंधाऱ्याची झाली दुर्दशा'; सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरही पुलावरील वाहतूक अद्याप बंद

SCROLL FOR NEXT