Imran Khan Aamir Khan nephew reaction  esakal
मनोरंजन

Imran Khan : बॉलीवूडपासून लांब गेला, बंगला सोडला, फरारी विकली! आमिरचा भाचा आहे तरी कुठं?

एक अभिनेता म्हणून नव्हे तर आमिर खानचा भाचा म्हणूनच इम्रानच्या वाट्याला जास्त प्रसिद्धी आली होती असे सांगितले जाते.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Imran Khan Aamir Khan nephew reaction : आमिरच्या लेकीचं इराचं लग्न झालं तेव्हा त्या लग्नसोहळ्याला त्याचा भाचा इम्रान खान दिसला होता. फोटो काढण्यासाठी तो स्टेजवर आला होता. तितकीच काय त्याची ती बऱ्याच दिवसांपूर्वीची झलक. त्यानंतर तो पुन्हा गायब झाला. ज्यांनी जाने तू या जाने ना नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यांना इम्रान खान( Imran Khan) कोण, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

खरं तर दिल्ली बेल्ली नावाच्या चित्रपटातही तो चमकला होता. त्याच्या अभिनयाची म्हणावी अशी चमक काही प्रेक्षकांच्या मनावर उमटली गेली नाही आणि तो बॉलीवूडपासून लांब गेल्याचे सांगितले जाते. दिल्ली बेलीनंतरही त्यानं काही चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र ते चित्रपट आले आणि गेले त्या बरोबर इम्रानही विस्मरणात गेल्याचे सांगितले जाते. आता पुन्हा एका मुलाखतीच्या निमित्तानं चर्चेत आला आहे.

इम्रान हा आता त्याच्या कमबॅकमुळे चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. एक अभिनेता म्हणून नव्हे तर आमिर खानचा भाचा म्हणूनच इम्रानच्या वाट्याला जास्त प्रसिद्धी आली होती असे सांगितले जाते. त्यानंही त्याच्या चित्रपटांमधून म्हणावी अशी भुरळ प्रेक्षकांना पाडली नाही. इम्राननं त्याच्या एका मुलाखतीमध्ये चाहत्यांना धक्कादायक असे विधान केले आहे.

त्यानं सांगितलं की, २०१६ मध्ये त्याच्या आयुष्यात एक वादळ आलं आणि त्याला उद्धवस्त करुन गेलं. त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर झाला. त्याचवेळी त्यानं अभियन आणि ते क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. व्होग इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं हे वक्तव्य केलं आहे. मला माझ्या मुलीसाठी स्वतामध्ये काही बदल करणे अपेक्षित होते. आणि त्यानुसार मी ते बदल करायला सुरुवात केली.

लक्झरी लाईफ सोडली....

मी माझी जी लक्झुरीयस लाईफ होती त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप सारे बदल होत गेले. मी माझी आवडती फरारी कार विकली. पाली हिलमध्ये जो बंगला होता तो सोडून बांद्रामध्ये जो फ्लॅट आहे तिथे राहतो आहे. मी आता एक साधं आयुष्य जगतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Maharashtra Drought Relief : दुष्काळी मदतीसाठी 'ई-पीक पाहणी' ठरणार जाचक? अट शिथिल करण्याची गरज; राज्यात 35.37 टक्के गटांची पाहणी

Marathi News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्लीतील 'बारापुल्ला फेज-३' कॉरिडॉरचे उद्घाटन

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

SCROLL FOR NEXT