in front of jawan subhedar marathi movie successful third week start  SAKAL
मनोरंजन

Subhedar: 'जवान' पाहायला जा पण 'सुभेदार' कडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, यशस्वी तिसरा आठवडा

जवान सिनेमा रिलीज झालाय पण सिंहगडाचा पोवाडा सुभेदार सुद्धा गाजतोय

Devendra Jadhav

शाहरुखचा जवान सिनेमा रिलीज होऊन १ दिवस उलटून गेलाय. शाहरुखच्या जवानने बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई करतोय. जवान बॉक्स ऑफीसवर सर्वाधिक कोटींची कमाई करणारा बॉलिवूडचा बिगेस्ट ओपनर सिनेमा ठरलाय.

जवान पाहायला प्रेक्षकांची गर्दी होतेय. जवान हाऊसफुल्ल होतोय पण मराठी सिनेमा सुभेदार सुद्धा जवानला तगडी टक्कर देतोय.

सुभेदार सिनेमाची यशस्वी घोडदौड

अनेकांना वाटत होतं की शाहरुखचा बिग बजेट जवान आल्यावर सुभेदार सिनेमाला थिएटर मिळणार नाहीत. परंतु असं काही नाहीय, बिग बजेट हिंदी सिनेमा समोर असताना सुद्धा सुभेदार सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे.

सुभेदार सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केलंय. सुभेदार सिनेमाच्या टीमने खास पोस्टर शेअर करुन ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय.

सुभेदार सिनेमाचं आजवरचं बॉक्स ऑफीस कलेक्शन

Sacnilk च्या अहवालानुसार सुभेदारने गेल्या १३ दिवसात बॉक्स ऑफीसवर १३.२३ कोटींची कमाई केलीय. सुभेदारने पुन्हा दाखवून दिलंय की ऐतिहासीक सिनेमा चांगला असला की प्रेक्षक सिनेमा डोक्यावर घेऊ शकतात.

जवान सारखा तगडा हिंदी सिनेमा समोर असुनही सुभेदार तिसऱ्या आठवड्यात थिएटरमध्ये तळ ठोकून आहे ही निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे.

सुभेदार मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज

शिवराज अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' यानंतर 'सुभेदार' हा पाचवा भाग शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प आहे.

सुभेदार सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT