Ind vs Aus WC Final Will India win the World Cup against Australia? Salman Khan made 'this' prediction tiger 3 SAKAL
मनोरंजन

Ind vs Aus WC Final: भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकप जिंकणार? सलमान खानने सर्वांसमोर केली 'ही' भविष्यवाणी

सलमानने उद्या होणाऱ्या वर्ल्डकपच्या फायनल सामन्याविषयी भाष्य केलंय

Devendra Jadhav

Ind vs Aus WC Final 2023: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनलची सर्वांना उत्सुकता आहे. उद्या रविवारी १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर फायनल रंगणार आहे.

फायनल पाहण्यासाठी अनेक राजकीय - मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अशातच सलमान खानने वर्ल्डकप फायनलमध्ये कोण जिंकणार याची भविष्यवाणी केलीय. काय म्हणाला सलमान पाहा.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोण जिंकणार? सलमान म्हणाला...

मुंबईत टायगर 3 सिनेमाचा एक इव्हेंट झाला. त्यावेळी, भाईजानने क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळी टायगर 3 च्या रिलीजचा संदर्भ दिला आणि भारताच्या विजयाबद्दल आशावाद व्यक्त केला.

भाईजान म्हणाला, 'भारताने यंदा प्रत्येक क्रिकेटचा सामना जिंकला आहे. वर्ल्डकपचा माहोल असताना आम्ही 'टायगर 3' रिलीज केला. असं असुनही सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली. आता भारत वर्ल्डकप जिंकेल आणि पुन्हा एकदा टायगर 3 पाहायला सर्व चित्रपटगृहांमध्ये गर्दी होईल." सलमानच्या या विधानाला चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल रंगणार

भारताने न्युझीलंडला सेमीफायनलमध्ये हरवुन वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मजल मारली. तर साऊथ आफ्रिकाला हरवत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये आलीय.

त्यामुळे रविवारी १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्डकप फायनल रंगणार आहे. १९८३, २०११ नंतर भारत यंदा तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टायगर 3 बद्दल थोडंसं...

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आणि मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. 

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात शाहरुख खान, हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेला टायगर 3 ने आतापर्यंत 200 कोटींची कमाई केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT