Surya Kumar Yadav Trolled esakal
मनोरंजन

Surya Kumar Yadav Trolled : 'तू आम्हाला नाराज केलं'! नेटकऱ्यांनी सुर्यावर केली आगपाखड

भारताचा कर्णधार रोहित शर्मानं दमदार सुरुवात करत ४७ धावांची खेळी केली. त्यानंतर तो बाद झाला.

युगंधर ताजणे

IND vs AUS world cup final 2023 Suryakumar Shbhman : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान आज अंतिम फेरीचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. मात्र या सामन्यांमध्ये भारताच्या फलंदाजांनी निराशा केल्याचे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजी करण्यास निमंत्रित केले.

भारताचा कर्णधार रोहित शर्मानं दमदार सुरुवात करत ४७ धावांची खेळी केली. त्यानंतर तो बाद झाला. मात्र त्यापूर्वीच गिलनं खराब फटका मारुन विकेट गमावल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला. भारताच्या किंग कोहलीकडून या सामन्यात मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यानं अर्धशतक पूर्ण करुन परतीची वाट धरली. या सगळ्यात फायनलमध्ये अय्यर आणि सुर्यकुमार यादव यांनी प्रभावी कामगिरी करावी अशी हजारो चाहत्यांची अपेक्षा होती.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

भारतीय फलंदाजी कोळल्यानंतर सोशल मीडियावर मात्र नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना केल्या आहेत. यात प्रामुख्यानं शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि सुर्यकुमार यादव यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. खरंतर यापूर्वीच्या सामन्यामध्ये गिल आणि अय्यरनं प्रभावी कामगिरी केली आहे. सुर्यकुमारला म्हणावी अशी संधी काही मिळाली नाही.

फायनलमध्ये सुर्यकुमारला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र त्याला खेळपट्टी आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजीनं चांगलेच त्रस्त केल्याचे दिसून आले. तू आमची निराशा केली आहे. आम्हाला वाटलं तू शेवटच्या सामन्यात चांगली खेळी करशील असे वाटले होते. सुर्या तू निराश केले आहेस. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सुर्यावर राग व्यक्त केला आहे.

सुर्यानं पुढे येऊन फटके का नाही मारले, त्याची रणनीती नेमकी काय होती हे काही कळलं नाही. सुर्याला बसवून खरंतर अश्विनला संधी द्यायला हवी होती. कारण ऑस्ट्रेलियाकडे चार डावखुरे फलंदाज आहेत अशावेळी अश्विनची गरज भासेल. रोहितच्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह आहे. असे देखील नेटकऱ्यांनी म्हटले आहे. केवळ सुर्याच नाहीतर गिल आणि अय्यरलाही नेटकऱ्यांनी फटकारले आहे.

दरम्यान भारतानं ऑस्ट्रेलियाला २४० धावांचे लक्ष्य दिले आहे. त्यामुळे निर्धारित ५० षटकांमध्ये ऑस्ट्रेलिया कशी कामगिरी करते याकडे अनेकांचे लक्ष आहे. पाचवेळी विश्वविजेते पदाचा करंडक उंचावणाऱ्या कांगारुंवर मात करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना मोठी मेहनत करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT