मनोरंजन

'सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है'

देशात आज ७५ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2021 )मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

युगंधर ताजणे

देशात आज ७५ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2021 )मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्तानं देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. बॉलीवूडमधील bollywood सेलिब्रेटींनी देखील चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांना शुभेच्छा देताना देशभक्तीपर आठवणींनी उजाळाही दिला आहे. मोठ्या प्रयासानं देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यासाठी अनेकांचे बलिदान आहे. त्यांचे स्मरण करुन आजच्या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याचे काम सेलिब्रेटींनी केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक देशभक्तीपर चित्रपटही प्रदर्शित झाले आहे. त्यालाही चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे.

केवळ बॉलीवूडच नाहीतर टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींनी देखील चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याकडे प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्यदिन त्यानिमित्तानं अनेक गाणी आहेत. आजच्या दिनाच्या निमित्तानं सगळीकडे त्या गाण्यांचे सूर कानी पडतात. अनेक सेलिब्रेटींनी त्या गाण्यांच्या आठवणीही शेयर केल्या आहेत. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन amitabh bachchan , अजय देवगण ajay devgn, कंगना राणावत kangan ranaut यांनी चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करताना लिहिलं आहे की, सर्व चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांनी यावेळी काही फोटोही शेयर केले आहेत. चाहत्यांनी त्यांच्या या व्टिटला प्रतिसाद दिला आहे. प्रख्यात अभिनेता अजय देवगणनंही तिरंग्याच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी अजयचा भुज द प्राईड ऑफ इंडिया नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यालाही चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटामध्ये त्यानं विजय कुमार कर्णिक नावाच्या एअर फोर्स अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. वास्तविक घटनेवर आधारित हा सिनेमा आहे..

आपल्या परखड प्रतिक्रियेबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या कंगनानंही सोशल मीडियावरुन आजच्या दिनाच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं एक फोटो शेयर करुन शहीदांना आदरांजली वाहिली आहे. दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांनीही चाहत्यांना स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपला एक फोटो शेयर करुन त्याला कॅप्शन दिली आहे. त्यात त्यांनी सर्व चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT