मनोरंजन

Independence Day Special: बॉलीवूड-हॉलीवूडची मंदीत संधी

पुढील आठवडा भारतीय प्रेक्षकांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - पुढील आठवडा भारतीय प्रेक्षकांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. त्याचे कारण म्हणजे त्या आठवड्यात वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 15 ऑगस्टच्या निमित्तानं काही मालिका आणि चित्रपट यावेळी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मनोरंजनाची आगळी वेगळी मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमधील चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या मुहूर्तावर अमुक एखादी मालिका किंवा चित्रपट प्रदर्शित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं शेरशाह आणि भुज द प्राईम प्राईंड सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे गॉडझिला व्हर्सेस किंग काँग हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. याशिवाय काही मालिका देखील प्रसिद्ध होणार आहे. त्याची माहिती घेऊया. 11 ऑगस्चला हॉटस्टारवर व्हाट इफ नावाची मालिका प्रसिद्ध होणार आहे. मार्वल स्टूडिओची ही पहिली मालिका असणार आहे. त्या सीरिजचे दिग्दर्शन ब्रायन अँड्रयुज यांनी केलं आहे. नेटफ्लिक्सवर 11 ऑगस्टला द किसिंग बूथचा 3 सीझन प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे.

12 ऑगस्टला अॅमेझॉन प्राईवर शेरशाह प्रदर्शित होणार आहे. जो कारगील वॉरमध्ये शहिद झालेल्या विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कॅप्टन बत्रा यांना त्यांच्या या पराक्रमाबद्दल सर्वोच्च अशा परमवीर चक्रानं सन्मानीत करण्यात आलं होतं. विष्णू वर्धन यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात सिद्घार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

13 ऑगस्टला अजय देवगणचा भुज द प्राईड ऑफ इंडिया प्रदर्शित होणार आहे. अभिषेक दुधाईया दिग्दर्शित या चित्रपटामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1971 साली झालेल्या युद्धाचा मोठा पट मांडला आहे. हा चित्रपट वास्तव घटनेवर आधारित आहे. त्यात अजय देवगण हा स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या जोडील संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर आणि नोरा फतेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT