Big boss season news
Big boss season news Team esakal
मनोरंजन

बिग बॉसच्या निर्मात्यांना दणका, 1 लाखांचा दंड; सेट सील

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सध्या चित्रपटांचे आणि मालिकांचे शूटिंग सरकारनं लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करून सुरू आहे. पण तमिळनाडू सरकारनं सध्या राज्यात चित्रपटांच्या आणि मालिकांच्या शूटिंगसाठी बंदी केलीयं. हा नियम माहित असूनही चैन्नईतील ईव्हिपी फिल्म सिटीमध्ये 19 मे रोजी रात्री बिग बॉस मल्याळम सीजन ३ चे शूटिंग सुरू होते. याबद्दल माहिती होताच या शूटिंगच्या सेटवर सरकारची एक टीम पाठवण्यात आली. विभागीय अधिकारी प्रीती पार्कवी यांनी ईव्हिपी फिल्म सिटीमध्ये येऊन हा सेट रात्री 8 वाजता सील केला.

प्रीती पार्कवी यांनी सांगितले, 'आम्ही हा सेट सील केला आहे. या शो च्या टीमवर आपत्ती व्यवस्थापन नियमाप्रमाणे कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एफईएफएसआय युनियनचे अध्यक्ष आरके सेल्वमनी यांनी याबाबत याआधी छोट्या पडद्यावरील मालिकांच्या किंवा शो शूटिंगच्या बंदीचा निर्देश दिला होता. हा नियम माहित असूनही बिग बॉसच्या प्रॉडक्शन हाऊसनं शूटिंग सुरू ठेवले. त्यामुळे आम्ही या शो च्या सेटवर आलो आणि पाहणी केली काही लोक सेटच्या आत होते. त्यांना सेटमध्येच जेवण दिले जात होते. त्या घरात 7 जण होते. तसेच कॅमेरामॅन, तांत्रिक विभागाची माणसे तसेच प्रॉडक्शन हाऊसची माणसे होती. या शो चे 95 भाग पुर्ण झाले होते. त्यांना आणखी 5 भागांचे शुट करून 100 एपिसोडचा शो पुर्ण करायचा होता. पण आम्ही त्यांना पुढील 5 भागांच्या शूटिंगसाठी परवानगी दिली नाही. त्यासर्वांना आम्ही पीपीई किट दिले आणि लगेच सेटमधून जाण्यास सांगितले. या शोच्या टिमला 1 लाख रूपयांचा दंड भरावा लागणार आहे.'

सध्या बिग बॉस शोच्या सर्व टिमची एका खासगी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच शोचे काही तांत्रिक विभागाचे लोक एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहात होते. त्यांना आता ते सोडून जाण्यास सांगितले आहे. प्रोडक्शन हाऊसच्या सर्व टिमला केरळला जाण्यासाठी ई-पास देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT