'टँलेटला महत्व नाही, कोण किती गरिब याकडं निर्मात्याचं लक्ष' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'टँलेटला महत्व नाही, कोण किती गरिब याकडं निर्मात्याचं लक्ष'

'टँलेटला महत्व नाही, कोण किती गरिब याकडं निर्मात्याचं लक्ष'

मुंबई - भारतीय टेलिव्हिजनच्या क्षेत्रात सर्वाधिक मनोरंजन करणारे जे रियॅलिटी शो आहेत त्यात इंडियन आयडॉलचा वाटा मोठा आहे.त्याचा फॅन्स फॉलोअर्सही मोठे आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगात या शो चे चाहते आहेत. एवढा लोकप्रिय असणारा हा कार्यक्रम नेहमी वादाच्या भोव-यात अडकलेला दिसून येतो. त्याचे कारण या मालिकेत येणारे वेगवेगळे सेलिब्रेटी. ते ज्या पध्दतीनं स्पर्धकांना कमेंट देतात त्यावरुन त्या शो चा दर्जा आणखी वाढला आहे. आता त्या शो च्या बाबत पहिला इंडियन आयडॉल (Indian Idol ) अभिजित सावंतनं (Abhijeet Sawant) त्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे तो चर्चेत आला आहे. (Abhijeet Sawant talk About Indian Idol 12 Reality After Amit Kumar)

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रख्यात गायक किशोर कुमार (kishor kumar) यांचे चिरंजीव अमित कुमार यांनी देखील या रियॅलिटी शो बाबत एक कमेंट केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु झाली होती. आम्हाला स्पर्धकांचे कौतूक करण्याचे पैसे मिळतात. अशा प्रकारची जळजळीत प्रतिक्रिया अमित कुमार यांनी दिली होती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. सोशल मीडियावर इंडियन आयडॉलवर (Indian Idol ) टीका होऊ लागली. अनेकदा यासगळ्याचा परिणाम त्या कार्यक्रमाच्या टीआरपीवरही होत असल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळे सेलिब्रेटी कार्यक्रमात येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे काम करतात.

अमित कुमार यांच्या त्या वक्तव्याला इंडियन आयडॉलचा होस्ट आदित्य नारायणनं त्यावर आपले मत मांडले होते. त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. एका मुलाखतीत अभिजितनं सांगितलं की, आजकाल जे काही रियॅलिटी शो आहेत त्यात स्पर्धकांच्या टॅलेंटला महत्व दिले जात नाही त्यापेक्षा तो किती गरिब आहे हे दाखविण्यास प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही एखादे रिजनल रियॅलिटी शो पाहत असाल तर तुम्हाला त्या स्पर्धकाच्या बॅकग्राऊंडविषयी माहिती होते. अशाप्रकारे हे रियॅलिटी शो आपले मनोरंजन करत असतात.

हेही वाचा: Jr NTR बर्थ डे, फॅन्सला रिटर्न गिफ्ट, RRR च्या Komaram Bheem नवा लुक

हेही वाचा: दोन महिन्याचं बाळ झालं पोरकं, दुधासाठी भूमीची हाक

आता तर अशा प्रकारच्या शो मध्ये त्या स्पर्धकांचे लव अँगलही दाखविले जात आहेत. जे चूकीचे वाटतात. गेल्या काही दिवसांपासून अरुणिता, कांजीलाल आणि पवनदीप राजन यांच्यातली केमिस्ट्री दाखविली जात आहे. जसे की मागच्या सीझनमध्ये आदित्य नारायण आणि नेहा कक्कर यांच्याविषयी बोलले जात होते. असेही अभिजीतनं सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top