India vs Australia 2023 Anushka, Sara and Athiya, Lady Luck reached Ahmedabad SAKAL
मनोरंजन

India vs Australia 2023: भारतासाठी 'शुभ'शकून! अनुष्का, सारा अन् अथिया, लेडी लक पोहचलं अहमदाबादमध्ये

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल पाहायला भारताचं लेडी लक अहमदाबादला

Devendra Jadhav

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल सुरु व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. भारत ऑस्ट्रेलियाला हरवून तिसऱ्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरणार का ? याचं उत्तर लवकरच संपूर्ण जगाला कळेल.

अशातच संपूर्ण वर्ल्डकपमध्ये भारताला सपोर्ट करणाऱ्या लेडी लक अर्थातच सारा तेंडुलकर, अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी अहमदाबादला पोहोचल्या आहेत.

(India vs Australia 2023 Anushka, Sara and Athiya, Lady Luck reached Ahmedabad)

भारताचं लेडी लक अहमदाबादमध्ये दाखल

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा एका खाजगी जेटने टीम इंडियाच्या सपोर्ट करायला अहमदाबादला पोहोचली आहे. तर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी देखील सामन्याच्या दोन दिवस आधीच अहमदाबादमध्ये दाखल झालीय. अथिया - अनुष्का वर्ल्डकपच्या महत्वाच्या सामन्यांमध्ये उपस्थित राहून भारतीय क्रिकेट संघाला सपोर्ट करताना दिसल्या.

सारा तेंडूलकर सुद्धा अहमदाबादमध्ये दाखल

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांची लेक सारा सुद्धा अहमदाबादला पोहोचली आहे. सारा आणि भारताचा सलमीचा फलंदाज शुभमन गिलला एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना वर्ल्डकपमध्ये उधाण आले. सारा वर्ल्डकपच्या प्रत्येक सामन्यात स्टेडियममध्ये उपस्थित होती. सारा - शुभमन यांनी त्यांच्या नात्याचा अधिकृत खुलासा केला नाहीय. साराची आज वर्ल्डकप फायनलसाठी असलेली उपस्थिती लक्षवेधी ठरणार, यात शंका नाही.

भारत तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरणार?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल सामन्याला आता अवघे काही तास बाकी आहेत. या सामन्याला रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, रजनीकांत, अमिताभ बच्चन, मिथीला पालकर, कतरिना कैफ, अनिल कपूर, व्यंकटेश हे कलाकार फायनल बघायला उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक राजकीय व्यक्ती स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT